पोलीस निरीक्षकामुळे अवैध दारु विक्रेत्याचे हृदय परिवर्तन, मद्यविक्री सोडून चहाचं हॉटेल सुरु

| Updated on: Aug 01, 2021 | 11:20 AM

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी बाळासाहेब माने यांना पोलीस ठाण्यात बोलावले. 'तुम्ही अवैध धंदे करू नका' अशी वेळोवेळी समज दिली. चांगला सन्मानजनक व्यवसाय करा मी आवश्यकतेनुसार तुम्हाला मदत करेन, असे आश्वासनही यादवांनी मानेंना दिले होते.

पोलीस निरीक्षकामुळे अवैध दारु विक्रेत्याचे हृदय परिवर्तन, मद्यविक्री सोडून चहाचं हॉटेल सुरु
अहमदनगरमध्ये अवैध दारु विक्री सोडून चहाचे हॉटेल
Follow us on

अहमदनगर : अहमदनगरमधील कर्जतच्या पोलीस निरीक्षकामुळे एक दारु विक्रेत्याचे मत परिवर्तन झाले. त्याने दारु विक्री सोडून चक्क चहाचे हॉटेल सुरु केले. ‘तुम्ही अवैध धंदे करु नका’ अशी वेळोवेळी दिलेली समज बाळासाहेब माने यांचे हृदय परिवर्तन करणारी ठरली.

अहमदनगरला कर्जतच्या पोलीस निरीक्षकामुळे एका दारु विक्रेत्याचे मन परिवर्तन झाले. त्यामुळे त्याने दारु विक्री सोडून चक्क चहाचे हॉटेल सुरु केले आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी ही किमया केली आहे. कर्जत शहरातील बाळासाहेब माने हे अवैध दारु विक्री करत होते. त्यामुळे त्यांच्यावर यापूर्वी वारंवार कारवाया करण्यात आल्या होत्या.

चंद्रशेखर यादव यांच्याकडून समज

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी माने यांना पोलीस ठाण्यात बोलावले. ‘तुम्ही अवैध धंदे करू नका’ अशी वेळोवेळी समज दिली. चांगला सन्मानजनक व्यवसाय करा मी आवश्यकतेनुसार तुम्हाला मदत करेन, असे आश्वासनही यादवांनी मानेंना दिले होते.

श्री साई कृपा नावाने चहाचे हॉटेल

चंद्रशेखर यादव यांची ही तळमळ दारु विक्रीचा व्यवसाय करणारे बाळासाहेब माने यांचे मनपरिवर्तन करणारी ठरली. त्यांनी भांडेवाडी येथे करमाळा रस्त्यालगत श्री साई कृपा नावाने चहाचे हॉटेल सुरू केले. या हॉटेलला स्वतः यादव यांनी भेट देत माने यांचे कौतुक केले आहे.

रक्षाबंधनाला बहिणींकडून भावाचा दारुचा गुत्ता उद्ध्वस्त

दरम्यान, गावातील अवैध दारुमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. लहान मुलेही दारूच्या आहारी गेली आहेत. त्यामुळे रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर दोघी बहिणींनी गावातील अवैध दारू बंद करायची, असा निश्चय केला. दोन्ही बहिणींनी एकत्र येऊन भाऊ प्रकाश चव्हाण यांचा दारुचा अड्डा उद्ध्वस्त केला. गेल्या वर्षी बुलडाण्यात ही घटना समोर आली होती.

संबंधित बातम्या :

रक्षाबंधनादिवशी रणरागिणीचे रुप, बहिणींकडून भावाचा अवैध दारुचा व्यवसाय उद्ध्वस्त

गावातील अवैध दारु विक्री बंद करण्यासाठी महिलांचं अनोखं आंदोलन, भरवला दारुविक्रीचा बाजार!

(Ahmednagar Police Inspector appeals Illegal liquor seller to stop business later opens Tea Hotel)