अमरावतीत मुस्लिम संघटनांकडून त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ दुकानं बंद, मोर्चाला हिसंक वळण, 2 पोलीस जखमी

पोलीस व आंदोलक आमने सामने देखील आले होते. तर यात दोन पोलीस कर्मचारी दगडफेक झाल्याने जखमी झाल्याची माहिती आहे.

अमरावतीत मुस्लिम संघटनांकडून त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ दुकानं बंद, मोर्चाला हिसंक वळण, 2 पोलीस जखमी
Follow us
| Updated on: Nov 12, 2021 | 7:02 PM

अमरावती: त्रिपुरामध्ये मस्जिद पाडल्याच्या कथित घटनेचा निषेध करण्यासाठी अमरावती मध्ये मुस्लिम बांधवानी आपली दुकाने बंद ठेवली व घटनेचा निषेध केला होता. निषेध करण्यासाठी काढण्यात आलेल्या15 ते 20 हजार लोकांच्या या मोर्चाला हिंसक वळण लागले. यावेळी मोर्चा करांनी जयस्थभ चौकातील व शहरातील विविध भागातील 20 ते 22 दुकानांची प्रचंड तोडफोड केली तसेच एका दुचाकीचीही तोडफोड केली.

भाजपविरोधात घोषणाबाजी

मोर्चा दरम्यान मोर्चेकऱ्यांनी भाजप विरोधात व आरएसएस विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान पोलीस व आंदोलक आमने सामने देखील आले होते. तर यात दोन पोलीस कर्मचारी दगडफेक झाल्याने जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, या मुस्लिम मोर्चाला पूर्णपणे गालबोट लागले

राज्य सरकारनं प्रकरणाची दखल घ्यावी: देवेंद्र फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्रिपुरातील कथित घटनांचे भांडवल करून आज अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे मोठ्या संख्येने निघालेले मोर्चे आणि त्यातून घडलेले दगडफेक, तोडफोड, हिंसेचे प्रकार अतिशय चिंताजनक आहेत. असं म्हटलंय. राज्य सरकारने त्वरित याची दखल घेऊन परिस्थिती नियंत्रणात राहील, याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

नांदेडमध्येही तोडफोड

नांदेडमध्ये आज विविध मुस्लिम संघटनांनी एकत्र येत बंद पाळला. यावेळी मोठ्या संख्येने एकत्र आलेल्या आंदोलकांनी जोरदार नारेबाजी केली. मात्र या बंद दरम्यान शहरात काही ठिकाणी समाज कंटकानी दगडफेक करत तणाव पसरवलाय. देगलूर नाका भागात पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आलीय, तर काही खाजगी वाहने देखील समाज कंटकांनी फोडली आहेत. तर याच समाज कंटकाच्या दगडफेकीत दोन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झालेत. दरम्यान, पोलिसांनी अश्रू धुरांच्या नळकांड्यांचा आणि बळाचा वापर करत शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलाय. या घटनेनंतर नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात अफवा पसरून तणाव निर्माण झालाय. पोलिसांनी अटकसत्र राबवण्यास सुरुवात केली असून शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

इतर बातम्या:

त्रिपुरातील घटनेचे महाराष्ट्रात पडसाद, काही शहरांमध्ये तणाव; अमरावतीतील रॅलीला हिंसक वळण

Anil Parab | नितेश राणे कोण? आम्ही मोजतही नाही आणि किंमतही देत नाही : अनिल परब

Amaravati Muslim protesters march turn into violent two police injured

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.