रुग्णालयात जाण्यासाठी दोन किमीचा खांद्यावर प्रवास, रुग्णांना सहन कराव्या लागतात यातना

मरणासन्न यातना होत होत्या. रस्ता नसल्याने गावाबाहेर रुग्णालयात जायचं कसं असा प्रश्न होतो. माझ्या छातीत दुखत असल्याने मला खांद्यावर उचलून रुग्णालयात नेले.

रुग्णालयात जाण्यासाठी दोन किमीचा खांद्यावर प्रवास, रुग्णांना सहन कराव्या लागतात यातना
Follow us
| Updated on: Jul 28, 2023 | 7:01 PM

नांदेड : वृद्ध महिलेला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी खांद्यावर बसवून दोन किलोमीटर न्यावे लागलंय. नांदेड जिल्ह्यातील ही घटना आहे. हिमायतनगर तालुक्यातील पावनमारी येथील 65 वर्षीय राधाबाई जाधव यांना छातीत त्रास होऊ लागला. पण पावनमारी ते खडकीपर्यंतचा दोन किलोमीटरचा पूर्ण रस्ता चिखलमय असल्याने दुचाकीवरून जाणेही शक्य नव्हते. राधाबाई यांच्या नातेवाईकांनी त्यांना हाताने उचलून तर कधी खांद्यावर बसवून दोन किलोमीटरचा प्रवास केला. कोल्हापूर बंधाऱ्यारील पुल ढासळल्याने तिथूनही जाताना अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागला.

खडकी येथे कसेबसे पोहोचल्यानंतर पुढे हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयापर्यंत राधाबाई यांना एका दुचाकीवरून नेण्यात आले. पावनमारी गावाला रस्ता नसल्याने पावसाळ्यात अश्याच प्रकारे गरोदर महिला आणि आजारी व्यक्तींना न्यावे लागते. त्यामुळे इथे लवकरात लवकर रस्ता करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.

महिलेला छातीत दुखू लागल्याने उचलून नेले

रुग्ण महिला म्हणाली, मरणासन्न यातना होत होत्या. रस्ता नसल्याने गावाबाहेर रुग्णालयात जायचं कसं असा प्रश्न होतो. माझ्या छातीत दुखत असल्याने मला खांद्यावर उचलून रुग्णालयात नेले.

रस्त्याअभावी दुचाकीही जात नाही गावात

पावनमारीला जाण्यासाठी रस्ता नाही. गरोदर महिला तसेच म्हाताऱ्या व्यक्तीला असंच उचलून रुग्णालयात न्यावे लागते. दोन दिवसांपूर्वी एका मुलाला विजेचा धक्का लागला होता. त्यालाही उचलून न्यावं लागलं. दुचाकी गाडीसुद्धा गावातून जात नाही. कोल्हापुरी बंधाऱ्यावरून दुचाकीने कसेतरी ये-जा करत होतो. पण, बंधाऱ्याचा रस्ताही गेल्या दहा दिवसांपासून वाहून गेला. कोणत्याही लोकप्रतिनिधीने आमची दखल घेतली नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय. पक्का रस्ता बनवून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

नांदेडमध्ये दोन घटनांत दोघांचा मृत्यू

नांदेड शहरातील नाल्यामध्ये पडल्याने वेगवेगळ्या घटनात दोघांचा मृत्यू झालाय. नांदेड शहरात काल मुसळधार पाऊस झाला. रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. लातूर फाटा चौरस्त्यावर रात्री सगळीकडे पाणी साचले होते. याच पाण्यातून हडकोकडे जाण्याचा प्रयत्न करताना विठ्ठल कापावार हे अंदाज न आल्याने पाय घसरून मोठ्या नाल्यात पडले. त्यांचा मृतदेह आज वसरणी जवळ नाल्यात आढळून आला.

तर दुसऱ्या एका घटनेत गांधी नगर भागातील नाल्यात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. अंदाजे 40 ते 45 वर्षीय व्यक्तीचा हा मृतदेह आहे. आज सकाळी हा मृतदेह नाल्यात दिसून आला. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला. अद्याप या व्यक्तीची ओळख पटली नाही. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये नाल्यात बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची नांदेडमधील ही पहिलीच घटना आहे.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.