सरकार कधी जातंय यासाठी अनेकांनी देव पाण्यात बुडवले, बाळासाहेब थोरातांचा भाजप नेत्यांना टोला

| Updated on: Oct 31, 2021 | 5:06 PM

आमचं सरकार आलं, सात जणांचा शपथविधी झाला तेव्हा आम्ही शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय कर्जमुक्ती मिळावी यासाठी काम केलं. त्या अगोदर शेतकऱ्यांना अनेक अर्ज भरावे लागत होते, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

सरकार कधी जातंय यासाठी अनेकांनी देव पाण्यात बुडवले, बाळासाहेब थोरातांचा भाजप नेत्यांना टोला
बाळासाहेब थोरात
Follow us on

अहमदनगर: काहीजण महाविकास आघाडी सरकार कधी जातेय यासाठी देव पाण्यात बुडवून बसले आहेत. महाविकास आघाडी सरकार कधी जाणार यासाठी काही जण रोज स्वप्न पाहतात. स्वप्नात ते बडबडत असतील. मात्र, महाविकास आघाडी सरकार दोन वर्ष चाललं आहे. पुढील तीन वर्ष देखील ती चालू राहणार आहे. आपण महाविकास आघाडी सरकार म्हणून पुन्हा निवडून येऊ, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या पाठिशी

महाविकास आघाडी सरकारचं काम चागलं सुरु आहे त्याला उद्धव ठाकरेंचं व्यक्तिमत्व कारणीभूत आहे. उद्धव ठाकरे सर्वांना समजावून घेतात, सगळ्यांना सोबत घेऊन काम करतात. आमचं सरकार आलं, सात जणांचा शपथविधी झाला तेव्हा आम्ही शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय कर्जमुक्ती मिळावी यासाठी काम केलं. त्या अगोदर शेतकऱ्यांना अनेक अर्ज भरावे लागत होते, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

कोरोनाचं संकट सर्वात चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रानं हाताळलं. उद्धव ठाकरेंचा सर्वात पहिला क्रमांक कोरोना हाताळण्यात लागला. आम्ही कोणतेही आकडे लपवले नाहीत. मृतांचे आकडे लपवण्याचा प्रयत्न करणारे उघडे पडले, ते गंगा नदीत दिसून आले. कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.

महाराष्ट्राच्या विकासासाठी काम सुरु राहणार

शेतकऱ्यांना 10 हजार कोटीचं पॅकेज दिलं. शेतकऱ्यांना आमच्या सरकारनं 30 ते 32 हजार कोटी दिली आहेत. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कुठंही मागं राहायचं नाही, असं आम्ही ठरवलं. दुसरीकडे शांततेनं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालयला निघाले होते. कोरोनाच्या संकटामुळं आर्थिक अडचणी आल्या तरी विकासाचा वेग कमी पडू न देता. महाराष्ट्राचा विकास करण्याचं काम आम्ही करतोय.

आदित्य ठाकरेंनी पर्यावरण खातं मागितलं

आदित्य ठाकरेंना कोणतं खातं विचारलं होतं, तेव्हा त्यांनी पर्यावरण आणि पर्यटन खातं घेतो, असं त्यांनी सांगितलं. मुंबई पाहायची म्हणजे काय करायचं?, असा प्रश्न होता. आदित्य ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेचं पर्यटन त्यांनी सुरु केली. रोजगार आणि आर्थिक उत्पन्न आहे. पर्यावरणाच्या बाबतीत झाडं, फुलं , पानं फळ यांची आपल्यापेक्षा जास्त माहिती आदित्य ठाकरे यांना आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. पर्यावरणाचा विषय आहे म्हणल्यावर त्यांना बोलावलं पाहिजे म्हटलं आणि ते यायला तयार झाले.

इतर बातम्या:

आदित्य ठाकरेंना पर्यावरण खातं कसं मिळालं? बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं ‘त्या’ दिवशी काय घडलं?

टायर फुटल्याने सांगलीत कारने दिंडीला चिरडलं, तिघा भाविकांचा करुण अंत

Balasaheb Thorat said BJP leaders watching dreams to came power but MVA come again in power