VIDEO: अजितदादानं गुण लावला दारू विकण्याचा, बंडातात्या कराडकरांच्या टार्गेटवर नेत्यांचे पोरंबाळही

| Updated on: Feb 04, 2022 | 11:12 AM

Bandatatya Karadkar कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर मोठा गदारोळ उडालेला आहे. गदारोळाचा धुरळा सुरू असतानाच बंडातात्यांचं आणखी एक वादग्रस्त विधान समोर आलं आहे.

VIDEO: अजितदादानं गुण लावला दारू विकण्याचा, बंडातात्या कराडकरांच्या टार्गेटवर नेत्यांचे पोरंबाळही
पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे निर्व्यसनी, सदाचारी; बंडातात्या कराडकर यांना उपरती
Follow us on

सातारा: कीर्तनकार बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule and Pankaja Munde) यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर मोठा गदारोळ उडालेला आहे. गदारोळाचा धुरळा सुरू असतानाच बंडातात्यांचं आणखी एक वादग्रस्त विधान समोर आलं आहे. यावेळी त्यांनी दुसरं तिसरं कुणी नसून थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांना टार्गेट केलं आहे. अजित पवार यांनीच दारू विकण्याचा गुण लावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसे सज्जन आहेत. पण अजितदादांनीच त्यांना वाईन विक्रीचा निर्णय घेण्यास भाग पाडल्याचं धक्कादायक विधान बंडातात्यांनी केलं आहे. तसेच ढवळ्याशेजारी पोवळा बांधला. त्यामुळे वाण नाही पण गुण लागणारच, असा दावाही बंडातात्या कराडकर यांनी केला आहे. त्यामुळे एकच बंडातात्यांच्या नव्या वादग्रस्त विधानामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यात निर्माण झाली आहे.

बंडातात्या कराडकर यांनी साताऱ्यात मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही विधाने केली. वाईन विक्रीच्या राज्य सरकारच्या निर्णयावरही त्यांनी घणाघाती टीका केली. ढवळ्या शेजारी पोवळा बांधला वाण नाही पण गुण लागला अशी म्हण आहे शेतकऱ्यांची. त्याची प्रचिती राज्यात येते. पोवळा म्हणजे उद्धव ठाकरे आणि ढवळा म्हणजे अतिजदादा. अजितदादानं हा गुण लावला ना दारु विकण्याचा. आधी अजितदादांनी सांगितलं मंदिर सुरू करायची नाहीत. अजितदादांनी सांगितलं ज्ञानोबारायांची दिंडी काढायची नाही. हे सर्व निर्णय अजितदादांचे आहेत. मी जाहीर सांगतो ही मनमानी आणि दादागिरी आहे. तुम्हाला काय लिहायचं ते लिहा, असं बंडातात्या म्हणाले.

सरकारला मद्यविक्रीची धुंदी

वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात आम्ही प्राथमिक स्वरुपात हे आंदोलन केलं आहे. हे आंदोलन विस्कळीत होणार नाही. यापुढे हे आंदोलन उग्र होत जाईल. संपूर्ण महाराष्ट्रात उग्र होत जाईल. शासनाला मद्याची धुंदी आहे. ती कधी तरी कमी होईल. शासनाला एक दिवस मद्यविक्रीचा निर्णय मागे घ्यावाच लागेल, असंही ते म्हणाले.

दुसरे पर्याय नाहीत का?

केवळ दारु विक्री करूनच महसूल मिळणार आहे का? महसूल मिळवण्याचे दुसरे पर्याय नाहीत का? सरकारने दुसरे पर्यायही शोधावे. तरुणांना वाईन पिण्याच्या नादी लावू नये, असं आवाहनही बंडातात्यांनी केले.

संबंधित बातम्या:

Bandatatya Karadkar: कुणाबद्दल आकस नाही, द्वेष नाही, अनावधानाने बोललो, सर्वांची माफी मागतो; बंडातात्या कराडकरांची जाहीर दिलगीरी

Bandatatya Karadkar | महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य, राज्यभरात गोंधळ ते माफी; वाचा बंडातात्या कराडकर चर्चेत का आले ?

Maharashtra News Live Update : नांदेडमधील तिन्ही नगराध्यक्षपदांची निवडणूक 14 फेब्रुवारीला