कर्जासाठी बँकेची टाळाटाळ, नांदेडमध्ये ‘शिवसैनिक’ शेतकऱ्याची आत्महत्या

| Updated on: Nov 02, 2021 | 8:12 AM

बँक पीककर्ज देत नसल्याने एका शेतकऱ्याने आत्महत्या (Farmer Suicides) केल्याची घटना नांदेडमध्ये ही घटना घडली आहे. दिवाळीच्या तोंडावर एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर मृत शेतकऱ्याच्या पत्नीने बँकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

कर्जासाठी बँकेची टाळाटाळ, नांदेडमध्ये शिवसैनिक शेतकऱ्याची आत्महत्या
संग्रहित छायाचित्र
Follow us on

नांदेड : बँक पीककर्ज देत नसल्याने एका शेतकऱ्याने आत्महत्या (Farmer Suicides) केल्याची घटना नांदेडमध्ये ही घटना घडली आहे. दिवाळीच्या तोंडावर एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर मृत शेतकऱ्याच्या पत्नीने बँकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

भगव्याने गळफास घेत शेतकऱ्याची आत्महत्या –

उत्तम कल्याणकर हा शेतकरी नांदेडमधील कंधार तालुक्यातील गोगदरी गावातील रहिवासी होता. तो एक शिवसैनिक असल्याची माहिती आहे. बँक कर्ज देत नाही म्हणून जगणे असह्य झाल्याने या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती आहे. शिवसैनिक असलेल्या या शेतकऱ्याने शिवसेनेचे प्रतीक असलेल्या भगव्या वस्त्रानेच गळफास घेत जीवन संपवलय. ऐन दिवाळीत घडलेल्या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येतेय.

बँकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

अवघी अडीच एकर जमीन असलेला हा शेतकरी नापिकी आणि कर्जबाजारी झाल्याने त्रस्त होता. त्यातच बँक वेगवेगळी कारणे दाखवत त्याला कर्ज देण्यास टाळाटाळ करत होती. त्यामुळे तणावाखाली येऊन त्याने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मृत शेतकऱ्याच्या पत्नीने बँकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीये. तर गावकऱ्यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी केलीये.

एकाच जिल्ह्यात 30 दिवसांमध्ये 25 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

पीकांचे नुकसान पैशांत भरुन निघेल पण अतिवृष्टीने झालेल्या नुकासानीच्या नैराश्यातून जीवन संपवलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचा काय? नुकताच ‘एनसीआरबी’ ने एक अहवाल सादर केला असून देशात गेल्यावर्षभरात शेतकरी आत्महत्या 18 टक्क्यांनी वाढल्या असल्याचे दिसून आले आहे.

शेती सिचंनासाठी शाश्वत पाणीपुरवठा नाही किंवा अतिवृष्टी झाल्यानंतर कोणते नियोजन नसल्याचा परिणाम काय असतो हे बीड जिल्ह्यातील गेल्या 10 महिन्यातील शेतकरी आत्महत्यांच्या आकडेवारीवरुन लक्षात येते. जानेवारी ते 30 ऑक्टोबर दरम्यानच्या कालावधीत या जिल्ह्यातील 158 शेतकऱ्यांनी आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा तर संपवली मात्र, कुटुंबियांच्या जीवनाची व्यथा होऊन बसली आहे.

धक्कादायक म्हणजे देशात महाराष्ट्रात तर सर्वाधिक आत्महत्या तर आहेतच पण चालू वर्षात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या या बीड जिल्ह्यात का असा सवाल उपस्थित झाला आहे. कारण, अतिवृष्टी दरम्यानच्या महिन्याभरात बीड जिल्ह्यात 30 दिवसांमध्ये 25 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे अतिवृष्टीच्या नुकसानीच्या खुणा या कायम राहणार आहेत.

संबंधित बातम्या :

Special Story ! अतिवृष्टीतील नुकसानीच्या खुणा, एकाच जिल्ह्यात 30 दिवसांमध्ये 25 शेतकऱ्यांच्या आत्महत्या