28 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली, हे सरकार संवेदनाहीन अन् गेंड्याच्या कातडीचं, प्रविण दरेकरांचा घणाघात

एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या तसेच त्यांच्या इतर अडचणींच्या मुद्द्याला घेऊन भाजप महाविकास आघाडीला लक्ष्य करत आहे. विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीदेखील सरकार गेंड्याच्या कातडीचं असल्याचं म्हणत राज्य परिवहन महामंडळाचे एमडी यांच्या कार्यालयाला टाळे लावण्यात येईल असा इशारा दिला.

28 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली, हे सरकार संवेदनाहीन अन् गेंड्याच्या कातडीचं, प्रविण दरेकरांचा घणाघात
pravin darekar
Follow us
| Updated on: Oct 30, 2021 | 6:25 PM

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या तसेच त्यांच्या इतर अडचणींच्या मुद्द्याला घेऊन भाजप महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य करत आहे. विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीदेखील सरकार गेंड्याच्या कातडीचं असल्याचं म्हणत राज्य परिवहन महामंडळाचे एमडी यांच्या कार्यालयाला टाळे लावण्यात येईल असा इशारा दिला. ते मुंबईत बोलत होते.

सरकार गेंड्याच्या कातडीचं, संवेदनाहीन

अहमदनगरला शेवगाव येथील एसटी चालकाने आगारात उभ्या असलेल्या एसटीला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. शुक्रवारी (29 ऑक्टोबर) सकाळी ही घटना घडली होती. तसेच मालेगावात एसटी चालकाच्या मुलानं आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केला. संबंधित मुलावर मालेगावात खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या सर्व घडामोडी घडत असताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षवेते प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारवर टीका केली. “सरकार गेंड्याच्या कातडीचं संवेदनाहीन आहे. 28 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यात कामावर आले नाही तर कारवाई करू, असं एसटीच्या एमडीने पत्रक काढले आहे. हे जुलमी पत्र असून वेळ पडली तर एमडीच्या कार्यालयाला टाळे लावू. अशा वेळी मी स्वत: उपस्थित असेल,” असे प्रविण दरेकर म्हणाले.

साखर आयुक्तांनी काढलेलं पत्रक अन्यायकारक

शेतकऱ्यांकडून वीजबील वसूल करण्यासाठी साखर आयुक्तांनी अजब आदेश दिला आहे. या आदेशात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या एफआरपीमधून वीजबिलं वसूल करण्यात यावीत असे निर्देश देण्यात आले आहेत. आयुक्तांच्या या आदेशावरदेखील दरेकर यांनी आक्षेप नोंदवला आहे. साखर आयुक्तांनी जे पत्रक काढले ते अन्यायकारक आहे. अशा पद्धतीने त्यांना वसुली करता येणार नाही. जुलमी पद्धतीने वसुली करू नये. त्याचा जाब आम्ही सरकारला विचारु, असं दरेकर यांनी म्हटलंय.

पण ते वेळोवेळी तोंडावर पडले

तसेच पुढे बोलताना त्यांनी शिवसेना तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली. हे आम्ही राष्ट्रीय स्तरावर निवडणुका लढू म्हणतात. पण वेळोवेळी ते तोंडावर पडले. उद्धव टाकरे यांच्यासाठी राऊत यांना बोलावं लागतं, अशी टीका दरेकर यांनी केली.

इतर बातम्या :

समीर वानखेडेंनी धर्मांतर केल्याचं दिसत नाही, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या उपाध्यक्षांचं मोठं विधान

मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएमकडून तिरंगा रॅलीची घोषणा, तर वंचितसोबत आघाडीचे ओवेसींचे संकेत!

Maharashtra Health Department Recruitment | आरोग्य विभागाची ‘गट ड’ भरती परीक्षा 31 ऑक्टोबरला, ‘गट क’ संवर्गातील परीक्षेची उत्तरतालिका जारी

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.