राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी घेतला भाजपच्या दोन आमदारांसोबत भोजनाचा आस्वाद; चर्चा तर होणारच

| Updated on: Aug 28, 2022 | 6:40 PM

मुर्तीजापूर मतदार संघाचे आमदार हरीश पिंपळे आणि अकोट मतदार संघाचे आमदार प्रकाश भारसाखळे या दोन भाजप आमदारांनी हजेरी लावली होती. आयोजित सोहळ्याची सांगताही भाजपच्या आमदाराने राष्ट्रगीत म्हणून केली.

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी घेतला भाजपच्या दोन आमदारांसोबत भोजनाचा आस्वाद; चर्चा तर होणारच
मुर्तीजापुरात भय्यासाहेब तिडके यांचा 75 वा अमृत महोत्सव
Image Credit source: t v 9
Follow us on

अकोला : सहकार नेते तथा माजी आमदार भय्यासाहेब तिडके यांचा 75 व्या अमृत महोत्सव सोहळा अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूरमध्ये आज पार पडला. या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) व माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingane) हे उपस्थित होते. दरम्यान, अकोला जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी भय्यासाहेब तिडके (Bhayyasaheb Tidke) यांच्या 75 व्या अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त मुर्तीजापूर शहरात आज आयोजित या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी हजेरी लावलीय. आयोजित सोहळ्यात व्यासपीठावर राष्ट्रवादींच्या नेत्यांची संख्या जास्त होती. विशेष म्हणजे, या सोहळ्याला भाजपच्या दोन आमदारांनी देखील उपस्थिती लावली आहे.

भाजपच्या आमदारांनी केले तिडकेंचे कौतुक

मुर्तीजापूर मतदार संघाचे आमदार हरीश पिंपळे आणि अकोट मतदार संघाचे आमदार प्रकाश भारसाखळे या दोन भाजप आमदारांनी हजेरी लावली होती. आयोजित सोहळ्याची सांगताही भाजपच्या आमदाराने राष्ट्रगीत म्हणून केली. त्यानंतर राष्ट्रवादीचे जयंत पाटील, माजी मंत्री राजेंद्र शिंगणेसह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडेसह अन्य राष्ट्रवादीच्या प्रमुख नेते एकत्र आले. भाजपचे आमदार पिंपळे आणि भारसाखळे यांनी त्यांच्यासोबतचं जेवणाचा आस्वाद घेतला. त्यांच्यात अनेक गोष्टीही रंगल्या. या प्रकारानंतर आता जिल्ह्यात अनेक चर्चांना उधाण आलेत. एवढंच नव्हे तर भाजपच्या आमदारांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार तिडके यांचे तोंड भरुन कौतुक केले.

राष्ट्रवादीच्या या नेत्यांची सोहळ्याला हजेरी

प्रदेश उपाध्यक्ष संतोष कोरपे, माजी मंत्री गुलाबराव गावंडे, विधान परिषद आमदार अमोल मिटकरी, माजी आमदार तुकाराम बिडकर, माजी आमदार हरिदास भदे, जिल्हा निरीक्षक प्रवीण कुंटे, डॉ. आशाताई मिरगे, प्रा. विश्वनाथ कांबळे, माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत पिसे त्याचबरोबर प्रदेश पदाधिकारी तथा प्रदेश प्रतिनिधी हे देखील प्रामुख्याने उपस्थित होते. त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिका सदस्य, माजी सभापती, उपसभापती, माजी नगरसेवक, माजी जि.प. सदस्यांनी हजेरी लावली आहे.

हे सुद्धा वाचा