AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिल्हा परिषद शाळेचा शिक्षक झाला कोरोना योद्धा, रुग्णांसाठी स्वखर्चानं मोफत ॲम्ब्युलन्स सेवा सुरु

निशिकांत उत्तमराव बडवाईक यांनी त्यांच्याकडील दोन वाहनांना रुग्णवाहिका बनवलं आहे. Nishikant Badwaik free ambulance

जिल्हा परिषद शाळेचा शिक्षक झाला कोरोना योद्धा, रुग्णांसाठी स्वखर्चानं मोफत ॲम्ब्युलन्स सेवा सुरु
निशिकांत बडवाईक यांनी रुग्णवाहिका सेवा सुरु केलीय
| Updated on: May 10, 2021 | 2:30 PM
Share

भंडारा: समाजाचे शिल्पकार म्हणजेच शिक्षक, स्वत:साठी कधीच जगत नाहीत. तर, समाजाचे उज्ज्वल भवितव्य ऊर्जावान बनविण्यासाठी जगतात. चांगले शिक्षण कोणालाही बदलू शकते. परंतु एक चांगला शिक्षक सर्वकाही बदलू शकतो. शिक्षक कधीही कामावरून रिक्त किंवा सेवानिवृत्त होत नसतात. ते आयुष्यभर ज्ञानाची ज्योती पेटलेली ठेवतात. आजच्या स्वार्थी आणि व्यापारीकरणाच्या युगात भंडारा जिल्ह्यातील असाच एक शिक्षक कोरोना महामारीविरुद्ध स्वतःचा जीव धोक्यात घालून सामाजिक जनजागृती करताना दिसून येत आहे. भंडाऱ्यातील एखाद्या नागरिकानं रुग्णवाहिकेसाठी फोन लावावा, हा शिक्षक रुग्णवाहिका घेऊन हजर होतो. या शिक्षकाचं नाव निशिकांत बडवाईक आहे. (Bhandara School teacher Nishikant Badwaik provide free ambulance service to corona patients)

दोन वाहनांचं रुग्णवाहिकेत रुपातंर

भंडारा जिल्ह्यातील मोहाडी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सकरला या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक असलेल्या निशिकांत उत्तमराव बडवाईक असे या शिक्षकाचे नाव आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांना वेळेवर वाहन उपलब्ध होत नाही. त्यामुळे रुग्णवाहिकेसाठी धावपळ बघायला मिळते. त्यामुळे या शिक्षकाने त्याच्याकडील दोन वाहनांना आता रुग्णवाहिका बनवलं आहे.

मास्क सॅनिटायझरचं मोफत वितरण

निशिकांत बडवाईक गावखेड्यात स्व:खर्चातून भटकंती करून नागरिकांना कोरोनाबाबत जनजागृती करीत मास्क आणि सॅनिटायझरचे मोफत वितरण करीत आहे. खऱ्या अर्थाने हा शिक्षक आता स्वतःचे जीव धोक्यात घालून नागरिकांना मोफत सुविधा देत असतानाच कोरोनायोद्धाची भूमिका बजावत आहे.कोरोना महामारीमुळे वर्षभर शाळा झाल्या नाहीत. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. या दोन महिन्यांच्या सुट्टीचा सदुपयोग गरीब जनतेसाठी करता यावा म्हणून निशिकांत यांनी हा पुढाकार घेतला आहे.

दोन शिक्षक सहभागी

कोरोना संकटाच्या या काळात नागरिकांना कोरोना विषय माहिती देऊन त्यांची जनजागृती करता आली तर, अनेक लोकांचे जीव वाचवता येईल, यासाठी गरजूंसाठी त्यांनी घेतलेला पुढाकार सर्व नागरिकांसाठी एक आदर्शवत उदाहरण ठरले आहे.त्यांची ही सेवा पाहून आणखी दोन शिक्षक त्यांच्यासोबत जोडले गेले आहेत. निशिकांत बडवाईक यांच्यासोबत ते देखील लोकांना सेवा देत आहेत.

प्रत्येकानी असे पुढे आल्यास या महामारीवर विजय मिळविता येईल. यामध्यामातून लोकांचे प्राण वाचविता येईल. या महामारीत रोजगार गेले, रोज कमवून खाणारे कसे जीवन जगणार त्यांना आपल्या परीने मदत करूया, सर्वाना आधाराची गरज आहे. सर्वानी माझे कुटुंब, बरोबरच माझा गाव, माझा समाज, माझा देश असा विचार केल्यास कोरोनाला परतवून शकतो, असं निशिकांत बडवाईक म्हणाले आहेत. भंडारा जिल्हा शिक्षक संघटनेच्या मुबारक सय्यद यांनी देखील निशिकांत बडवाईक यांचं कौतुक केलं आहे.

संबंधित बातम्या:

‘या’ राज्यांंमध्ये कोरोनाची लस मोफत! महाराष्ट्रात काय स्थिती? जाणून घ्या एका क्लिकवर

कोरोनाची लस सर्वांना मोफत मिळणार; केरळ सरकारची मोठी घोषणा

(Bhandara School teacher Nishikant Badwaik provide free ambulance service to corona patients)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.