Hasan Mushrif Ed raid : आताच धर्म कसा आठवला? हसन मियाँचं काऊंटडाऊन सुरू, हिशोब द्यावाच लागेल; सोमय्या यांचा सवाल

| Updated on: Jan 11, 2023 | 11:21 AM

मी कोल्हापूरला जात होतो. मी कारखान्यावर जात होतो. त्या दिवशी गणेश विसर्जन होतं. त्यावेळी मला गणेश विसर्जनला जाऊ दिलं नाही. हसन मियाँला हिशोब द्यावाच लागेल.

Hasan Mushrif Ed raid : आताच धर्म कसा आठवला? हसन मियाँचं काऊंटडाऊन सुरू, हिशोब द्यावाच लागेल; सोमय्या यांचा सवाल
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: ईडीने कारवाई सुरू केली आहे. हसन मियाँचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. हसन मियाँना हिशोब द्यावाच लागेल, असा इशारा देतानाच मी महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी आलो होतो. तेव्हा मला आडवलं, तेव्हा धर्म आठवला नाही का? गोरगरीबांचे पैसे खात होता, तेव्हा धर्म आठवत नव्हता का? आता ईडीने कारवाई सुरू केल्यानंतरच धर्म का आठवला? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन हसन मुश्रीफ यांच्या घोटाळ्यांचा पाढाच वाचला.

मला कोल्हापूरला जाऊ दिलं नाही. पण आज महालक्ष्मी मातेने आशीर्वाद दिला. हसन मुश्रीफ यांचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. रजत कन्झ्यूमर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून मुश्रीफ कुटुंबीयांच्या खात्यात 13 कोटी आले.

हे सुद्धा वाचा

2013मध्ये ही रक्कमम आली. ही कंपनी 2004मध्येच बंद झाली होती. जी कंपनी अस्तित्वातच नाही त्यातून मुश्रीफ कुटुंबाला रक्कम येते आणि साखर कारखान्यात जातेच कशी? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केली.

माऊंट कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतून मुश्रफ कुटुंबीयांच्या 24 कोटी 75 लाख रुपये आले. ही कंपनी अस्तित्वात नाही. ती बंद आहे. तिच्या नावाने अकाऊंट उघडले गेले. त्याची रोख रक्कम मुश्रीफ देतात, नतंर हे पैसे मुश्रीफ यांच्या खात्यात येतात. त्यानंतर हा पैसा रिअल इस्टेट आणि कारखान्यासाठी वापरला गेला, असा दावा सोमय्या यांनी केला.

जन कन्सल्टंट या कंपनीत 16 कोटी रुपये मुश्रीफ यांच्या खात्यात आले. कोल्हापूरच्या गरीब शेतकऱ्यांनी शेअर म्हणून पैसे गुंतवल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं. जी कंपनी अस्तित्वात नाही तिचे हे पैसे आहेत. मुश्रीफ यांनी त्यांच्या जावयाला 1500 कोटीचा कंत्राट दिलं, असंही ते म्हणाले.

मी कोल्हापूरला जात होतो. मी कारखान्यावर जात होतो. त्या दिवशी गणेश विसर्जन होतं. त्यावेळी मला गणेश विसर्जनला जाऊ दिलं नाही. हसन मियाँला हिशोब द्यावाच लागेल. हसन मियाँला आता धर्म आठवतो. महालक्ष्मीचं दर्शन घेताना मी जात होतो तेव्हा धर्म नाही आठवला? गरीबांचे पैसे खाताना धर्म नाही आठवला? असा सवालही त्यांनी केला.

ब्रिक्स आणि घोरपडे हे कारखाने इंटर कनेक्ट आहेत. हे सर्व मियाँचे कर्तृत्व आहे. त्यामुळे मुश्रीफ यांच्यासह तत्कालीन ग्रामविकास सचिव राजेशकुमार मीना यांचीही चौकशी करा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.