कार हायवेवर खोदलेल्या खड्ड्यात पडली; पाण्यात बुडून चौघांचा जागीच मृत्यू

| Updated on: Jun 29, 2021 | 12:52 PM

हा खड्डा महामार्गावरच असूनही त्याठिकाणी कोणताही धोक्याचा फलक लावण्यात आला नव्हता. त्यामुळे कार थेट या खड्ड्यात जाऊन कोसळली.

कार हायवेवर खोदलेल्या खड्ड्यात पडली; पाण्यात बुडून चौघांचा जागीच मृत्यू
Follow us on

हिंगोली: हिंगोलीच्या राज्य महामार्गावर घडलेल्या एका विचित्र अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. येथील सेनगावनजीक हा प्रकार घडला. या मार्गावर उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. मात्र, या पूलाचे काम बऱ्याच काळापासून रखडले आहे. या पुलासाठी एक खड्डा खोदण्यात आला होता. (Car fall into pothole 4 died by drowning into water Hingoli Maharashtra)

हा खड्डा महामार्गावरच असूनही त्याठिकाणी कोणताही धोक्याचा फलक लावण्यात आला नव्हता. त्यामुळे कार थेट या खड्ड्यात जाऊन कोसळली. हा खड्डा पाण्याने भरलेला होता. त्यामुळे पाणी थेट गाडीतील लोकांच्या नाकातोंडात गेले. परिणामी सर्वांचा मृत्यू झाला. चौघेही मृत लोणार तालुक्यातील खळेगाव, पळखेडा येथील रहिवासी आहेत.

मुंबईत कार विहिरीत बुडाली

घाटकोपर परिसरातील एका खासगी इमारतीच्या परिसरात रविवारी एक कार विहिरीत बुडाली होती. विहिरीवर एक स्लॅब टाकला होता. अर्धी विहीर झाकून स्लॅबच्या माध्यमातून त्यावर पार्किंगसाठी जागा करण्यात आली होती. हा स्लॅब पूर्णपणे जीर्ण झाला होता. या स्लॅबवर घाटकोपरच्या कामा लेनवरील रामनिवास या इमारतीत राहणारे डॉ. दोशी यांनी गाडी पार्क केली होती. यावेळी त्यांनी गाडी पार्क केल्यानंतर विहिरीवरील स्लॅब कोसळला. परिणामी कार थेट पाण्यात बुडाली.

हा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.त्यानंतर ही कार विहिरीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु होते. पंपाच्या साहाय्याने विहिरीतील पाण्याचा उपसा करुन क्रेनच्या साहाय्याने ही कार बाहेर काढण्यात आली. 12 तासांनी ही कार बाहेर काढली तेव्हा तिची अवस्था बघण्यासारखी झाली होती.

संबंधित बातम्या:

Video: काढायला गेले कार, सापडला मासा, मुंबईकरांच्या सुट्टीला असाही तडका

मुंबईकरांनो तुम्ही जे कराल ते इथेच भराल, ‘ती’ गाडी बघता बघता का बुडाली? वाचा, पहा

मुंबई किती धोकादायक? काही सेकंदात घरासमोर उभी असलेली कार थेट जमिनीत, पहा व्हिडीओ

(Car fall into pothole 4 died by drowning into water Hingoli Maharashtra)