Video: काढायला गेले कार, सापडला मासा, मुंबईकरांच्या सुट्टीला असाही तडका

मुंबईकरांचा रविवार एका बातमीमुळे चांगला चर्चेत गेला. ही बातमी आहे घाटकोपरची. सकाळी सकाळी एक व्हिडीओ व्हायरल झाला.

Video: काढायला गेले कार, सापडला मासा, मुंबईकरांच्या सुट्टीला असाही तडका


मुंबई : मुंबईकरांचा रविवार एका बातमीमुळे चांगला चर्चेत गेला. ही बातमी आहे घाटकोपरची. सकाळी सकाळी एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये एक कार हळूहळू पाण्यानं भरलेल्या खड्यात बुडत गेली. नंतर कळालं हा व्हिडीओ इतर कुठल्याही ठिकाणचा नसून तो घाटकोपरच्या एका सोसायटीतला आहे (Know all details about video of Ghatkopar car drowning in well amid heavy rain).

मासा नेमका कसा सापडला?

जवळपास बारा तासानंतर विहिरीत पडलेली कार बाहेर काढण्यात यश आलं. त्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली. मुळची जी विहिर होती ती पूर्ण उघडी करावी लागली. त्या विहिवर स्लॅब टाकून तिला बुजवण्यात आलं होतं. तो स्लॅब हटवण्यात आला. त्यानंतर विहिरीतलं पाणी मोटार पंप्सनी उपसून काढण्यात आलं. नंतर क्रेनच्या सहाय्यानं गाडी बाहेर काढण्यात आली. गाडी बाहेर काढल्यामुळे मालक खुश झाले पण याच गाडीत एका मासा सापडला. तो कोणत्या जातीचा आहे याचा अंदाज आलेला नाही. पण तो दोन ते अडीच फूट असल्याचा दिसतो आहे. गाडीत चक्क मासा सापडल्यामुळे उपस्थितीत मंडळी चांगलीच खुश झाली. गाडी बाहेर निघताच बघ्यांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला तर मच्छिप्रेमींनी तो मासा बघून.

नेमकी कार का बुडाली?

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी खड्डे तर पडले आहेतच पण काही ठिकाणी जागाही खचल्याचं दिसून आलं. त्यापैकीच घाटकोपरलाही असच काही घडल्याचा अंदाज बांधला गेला. म्हणजे पाण्यामुळे जमीन खचली आणि त्या खड्ड्यात कार हळूहळू नाहीशी झाली. पण वास्तव वेगळच उघड झालं आहे.

ज्या ठिकाणी कार जमीनीतल्या पाण्यात हळूहळू बुडाली ती मुळची विहिर आहे. म्हणजेच विहिरीच्या वर छत टाकून तिच्यावर पार्किंग तयार केली गेली आहे. पावसाच्या पाण्यानं विहिरीवरचा स्लॅब कमकुवत झाला आणि त्यावर उभी
असलेली कार त्या विहिरीत पडली. ही विहीर किती खोल आहे याचा अंदाज तुम्ही व्हिडीओत पाहुण करू शकता.
जवळपास 40 फूट विहीर खोल होती. त्यात ही कार पडली.

हेही वाचा :

मुंबईकरांनो तुम्ही जे कराल ते इथेच भराल, ‘ती’ गाडी बघता बघता का बुडाली? वाचा, पहा

मुंबई किती धोकादायक? काही सेकंदात घरासमोर उभी असलेली कार थेट जमिनीत, पहा व्हिडीओ

व्हिडीओ पाहा :

Know all details about video of Ghatkopar car drowning in well amid heavy rain

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI