मुंबईकरांनो तुम्ही जे कराल ते इथेच भराल, ‘ती’ गाडी बघता बघता का बुडाली? वाचा, पहा

मुंबईच्या घाटकोपर परिसरात पार्क केलेली कार एका विहिरीत बुडाल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली. कार बुडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे त्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. कार नेमकी का बुडाली याबाबत अनेक गोष्टी रंगवून सांगितल्या होत्या.

मुंबईकरांनो तुम्ही जे कराल ते इथेच भराल, 'ती' गाडी बघता बघता का बुडाली? वाचा, पहा
MUMBAI CAR


मुंबई : मुंबईच्या घाटकोपर परिसरात पार्क केलेली कार एका विहिरीत बुडाल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली. कार बुडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे त्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. कार नेमकी का बुडाली याबाबत अनेक गोष्टी रंगवून सांगितल्या होत्या. मात्र, ही कार बुडण्याचे नेमके कारण समोर आले आहे. अर्धी विहीर झाकून त्यावर गाडी पार्क केल्यामुळे शेवटी तीच गाडी थेट विहिरीत बुडाली आहे. (Car parked on slab of Well drowned into well see real video)

तर्कवितर्कांना उधाण

मुंबईत मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. सध्या पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी झालेल्या पावसामुळे मुंबईकरांची चांगलीच धांदल उडाली. अनेक ठिकाणी रस्ते तुंबले. तसेच लोकल सेवासुद्धा विस्कळीत झाली होती. याच पार्श्वभूमीवर आज (13 जून) दुपारी घाटकोपर परिसरात एक कार एक खड्ड्यात बुडत असल्याचा व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओमध्ये कार बुडताना स्पष्टपणे दिसत होती. हा व्हिडीओ पाहून नेटकरी तसेच मुंबईकर अनेक तर्कवितर्क लावत होते. काहींनी मुंबईत जास्त पाऊस झाला आहे. पाऊस जास्त झाल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी मुरले असून रस्ते खचले आहेत. याच मुरलेल्या पाण्यामध्ये कार बुडाली असल्याचा दावा केला. तर अनेकांनी कार खड्ड्याच्या बाजूला उभी केली असून त्याच खड्ड्यात ही कार पडली, असे सांगितले. आता कार नेमकी का पडली ? कुठे पडली ? हे समजले आहे.

कार बघता बघता का बुडाली ?

घाटकोपर परिसरात पार्क केलेली कार नेमकी कशामुळे बुडाली याबाबत अनेक तर्क लावले जात होते. मात्र, त्यामागचे नेमके कारण आता समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईच्या घाटकोपर परिसरात विहिरीवर एक स्लॅब टाकला होता. अर्धी विहीर झाकून स्लॅबच्या माध्यमातून त्यावर पार्किंगसाठी जागा करण्यात आली होती. हा स्लॅब पूर्णपणे जीर्ण झाला होता. या स्लॅबवर घाटकोपरच्या कामा लेनवरील रामनिवास या इमारतीत राहणारे डॉ. दोशी यांनी गाडी पार्क केली होती. यावेळी त्यांनी गाडी पार्क केल्यानंतर विहिरीवरील स्लॅब कोसळला. परिणामी कार थेट पाण्यात बुडाली.

पाहा व्हिडीओ :

दरम्यान, जागेची अडचण आणि लोकसंख्येची घनता यामुळे मुंबईत खुलेपणाने जगणे अत्यंत मुश्किल आहे. त्यामुळे काहितरी तडजोड करुन आपल्या गाड्या तसेच इतर सामान ठेवतात. कार पार्क करण्यासाठी विहिरीवर स्लॅब बांधण्याचा फंडा हा त्यापैकीच एक होता. मात्र, स्लॅब कोसळल्यामुळे त्याचे मोठे दुष्परिणाम भोगावे लागले. सध्याची घटना पाहून लोक आता मुंबईकरांनो तुम्ही जे कराल ते इथेच भराल असे म्हणत आहेत.

इतर बातम्या :

Maharashtra Coronavirus LIVE Update : सांगली जिल्ह्यात दिवसभरात 812 नवे कोरोनाबाधित, 20 रुग्णांचा मृत्यू

वन रूपी क्लिनिकचे संस्थापक डॉ. राहुल घुलेंच्या जिवाला धोका ? दिल्लीला स्थायिक होणार असल्याची माहिती

(Car parked on slab of Well drowned into well see real video)