Video : Akola Fire | अकोल्यात गोरेगाव येथे गुरांच्या गोठ्याला आग, जनावरे भाजली; 35 कोंबड्यांचा मृत्यू

Video : Akola Fire | अकोल्यात गोरेगाव येथे गुरांच्या गोठ्याला आग, जनावरे भाजली; 35 कोंबड्यांचा मृत्यू
अकोल्यात गोरेगाव येथे गुरांच्या गोठ्याला आग, जनावरे भाजली
Image Credit source: tv 9

रात्री दोनच्या सुमारास सारे गाढ झोपेत होते. गोठ्याला अचानक आग लागली. दामोदर गावंडे यांना अचानक जाग आली. तेव्हा गोठा जळत होता. गोठ्यात चार बैल बांधले होते. गायी तसेच वासरही होती. त्यांनी बैलांचे दावे ठिले केले. गायींनाही त्या गोठ्यातून सोडविले. तोपर्यंत बैल, गायी तसेच वासर जखमी झाली होती. जनावरांना सोडवित असताना दामोदर हेही जळाले. त्यांना जखम झाली.

गणेश सोनोने

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

May 21, 2022 | 11:38 AM

अकोला : जिल्ह्यातल्या गोरेगाव (Goregaon) बुजरूक येथे गोठ्याला आग लागली. ही आग रात्रीच्या सुमारास लागली. या आगीत चार बैल आणि दोन गाई भाजल्या गेलेत. शिवाय या आगीत 35 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. वाडेगाव येथूनच जवळ असलेल्या गोरेगाव बुजरुक येथील दामोदर वासुदेव गावंडे (Damodar Gawande) यांच्या जनावरांच्या गोठ्याला आग लागली. यात जनावरे सोडताना गोठा मालकही (Gotha Malik) भाजला आहे. गोठ्यातील चाराही जळाला. जनावरांवर उपचार करावे लागतील. तसेच गोठ्याची विल्हेवाटही त्यांना आता लावावी लागणार आहे. उन्हाने लाहीलाही सुरू आहे. उष्णता भरपूर आहे. त्यामुळं आग लागली की ती लगेच मोठी पेट घेते.

पाहा व्हिडीओ

नेमकं काय घडलं

रात्री दोनच्या सुमारास सारे गाढ झोपेत होते. गोठ्याला अचानक आग लागली. दामोदर गावंडे यांना अचानक जाग आली. तेव्हा गोठा जळत होता. गोठ्यात चार बैल बांधले होते. गायी तसेच वासरही होती. त्यांनी बैलांचे दावे ठिले केले. गायींनाही त्या गोठ्यातून सोडविले. तोपर्यंत बैल, गायी तसेच वासर जखमी झाली होती. जनावरांना सोडवित असताना दामोदर हेही जळाले. त्यांना जखम झाली. पण, स्वतःच्या जनावरांना वाचविल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता.

चाराही जळाला

जनावरांना लागूनच त्यांच्याकडं काही कोंबड्या होत्या. या आगीत सुमारे 35 कोंबड्या जळून खाक झाल्या. कोंबड्या लहान असल्यानं त्या लवकरच आगीच्या भक्ष्यस्थानी आल्या. कोंबड्या व त्यांची पिल्ले दामोदर वाचवू शकले नाही. जनावरांच्या गोठ्याला लागूनच चारा ठेवला होता. या चाऱ्यालाही आग लागली. काही चारा जळाला. जनावरांना आगीतून वाचविल्यानंतर चाऱ्याची आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. अर्धा चारा जळाला. काही चारा जळण्यापासून वाचविण्यात आला.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें