AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जमले होते लोक, अचानक असे काय घडले की सरणावर प्रेत टाकून लोक पळाले !

स्थानिक रहिवाशावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लोक एकत्र जमले होते. अंत्ययात्रा स्मशानभूमीत पोहचली आणि अंत्यसंस्कार सुरु झाले. पण अचानक जे घडले त्यानंतर सर्व लोकं प्रेत सरणावर टाकून पळाले.

स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जमले होते लोक, अचानक असे काय घडले की सरणावर प्रेत टाकून लोक पळाले !
चंद्रपूरमध्ये अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांवर मधमाशांचा हल्लाImage Credit source: TV9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: May 06, 2023 | 8:43 PM
Share

निलेश डहाट, TV9 मराठी, चंद्रपूर : जिल्ह्यातील सिंदेवाही शहरालगत एक भयंकर घटना घडली आहे. अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत गेलेल्या लोकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना आज दुपारी घडली. मधमाशांनी 40 जणांवर हल्ला केला असून, यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे स्मशानभूमीत एकच हाहाःकार उडाला. यानंतर परिस्थिती निवळल्यानंतर मयतावर सायंकाळी 5 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

सिंदेवाही येथे घडली घटना

सिंदेवाही येथील स्थानिक नागरिक राजू मार्तंडवार यांचे आज निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी शेजारी, नातेवाईक जमले होते. दुपारच्या सुमारास राजू यांच्यावर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार सुरु होते. यादरम्यान स्मशानभूमीत अचानक मधामाशा घुसल्या आणि अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांवर हल्लाबोल केला.

अंत्यसंस्कार सुरु असतानाच मधमाशांचा हल्ला

मधमाशांचा हल्लाबोल होताच अंत्यसंस्काराला जमलेले सर्व लोक प्रेत सरणावर सोडून स्मशानभूमीत पळू लागले. तब्बल 40 लोक मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झाले. यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परिस्थिती निवळल्यावर मयतावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

यवतमाळमध्ये लग्नाच्या वऱ्हाडावर मधमाशांचा हल्ला

लग्नाला आलेल्या वऱ्हाड्यांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना शुक्रवारी यवतमाळमध्ये घडली. मधमाशांच्या हल्ल्यात 50 जण जखमी झाले आहेत. दोन लहान मुलांसह अनेक महिला गंभीर जखमी आहेत. यवतमाळच्या नेर तालुक्यातील कामनदेवच्या मंदिरात ही घटना घडली. हल्ल्यानंतर वधू-वराकडील नागरिकांची धावपळ उडाली. अनेकांनी नाल्याच्या पाण्यात उडी मारली. लग्नमंडपातून नातेवाईकांनी पळ काढल्याने अन्नाची नासाडी झाली. मधमाशांच्या हल्ल्यानंतर जखमींनी बचावासाठी लोकांनी जंगलात धाव घेतली.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान