AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“खड्ड्यात पडायला या… मला अजून एक बळी पाहिजे”, उपरोधिक बॅनरची जोरदार चर्चा, आता तरी प्रशासनाला जाग येणार?

Pothole Sarcastic Banner: नाशिकमध्ये खड्ड्यांनी पाच जणांचा बळी घेतला. काही जण गंभीर जखमी झाले. पालघर, ठाण्यापासून तर राज्यातील अनेक शहरात खड्ड्यांनी वाहनधारक त्रस्त झाले आहेत. त्यातच या बॅनरने प्रशासनासह गुत्तेदारांना, कंत्राटदारांना जोरदार टोला लगावला आहे. या बॅनरमुळे वाहनधारक खड्ड्यात पडण्यापासून वाचले आहेत.

खड्ड्यात पडायला या... मला अजून एक बळी पाहिजे, उपरोधिक बॅनरची जोरदार चर्चा, आता तरी प्रशासनाला जाग येणार?
उपरोधिक बॅनरची चर्चा
| Updated on: Aug 09, 2026 | 10:32 AM
Share

श्रीराम क्षीरसागर, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी:   नाशिकमध्ये खड्ड्यांनी पाच बळी घेतले आणि काही जण जबर जखमी झाले. पालघर, ठाणेच नाही तर पुणे, पिंपरी चिंचवडपासून ते राज्यातील अनेक शहरात खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहेत. मुख्य रस्त्यावर नेम चुकला तोंड फुटले अशी स्थिती आहे. स्थानिक प्रशासन काही ठिकाणी खड्डे बुजवण्याचे काम करत आहे. तर दुसरीकडे काही ठिकाणी निगरगट्टपणाही समोर आला आहे. जीवघेणा खड्डा असतानाही त्याकडे प्रशासन, गुत्तेदार सपशेल दुर्लक्ष करताना दिसत आहे. अशाच ठिम्म प्रशासनाविरोधात धाराशिवमध्ये अनोखा बॅनर झळकला आहे. या बॅनरमुळे वाहनधारक सावध होत आहे. त्यांचा जीव वाचत आहे हे ही नसे थोडके.

नागरिकांची अनोखी बॅनरबाजी

धाराशिव शहरातील डी-मार्टकडे जाणाऱ्या रस्त्यावर जीवघेणा खड्डा झाला आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी अनोखी बॅनरबाजी केली आहे. “खड्ड्यात पडायला या… मला अजून एक बळी पाहिजे, त्याशिवाय माझे समाधान होणार नाही – धाराशिवचा लाडका गुत्तेदार” अशा आशयाचा उपरोधिक बॅनर सध्या शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. रस्त्याच्या मधोमध पडलेल्या मोठ्या खड्ड्याजवळ हा बॅनर लावण्यात आला आहे. त्याची जोरदार चर्चा होत आहे. हा बॅनर लावूनही प्रशासन जागचे हलले नाही हे विशेष. त्यांना अजूनही काहीच फरक पडला नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

एका बॅनरने वाचवला अनेकांचा जीव

डी-मार्ट रस्त्यावर अगदी मधोमध हा भलामोठा खड्डा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा धोकादायक खड्डा बुजवावा यासाठी प्रशासनाकडे तक्रारी झाल्या. त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. रस्त्याच्या मधोमधच मोठा खड्डा पडल्याने रात्रीच्या वेळी वाहनचालकांना खड्डा न दिसल्याने अपघात होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संतप्त नागरिकांची ही बॅनरबाजी केली. या बॅनरमुळे वाहनधारकांचा जीव वाचला आहे. त्यांना अगोदरच या ठिकाणी खड्डा असल्याचा अंदाज येत आहे. रात्रीच्यावेळी हा बॅनरच वाहनधारकांसाठी मदतीला आला आहे. हा खड्डा कधी बुजतो याकडे आता नागरिकांचे लक्ष लागेल आहे.

पिंपरी-चिंचवड येथे खड्डे बुजवण्याच्या कामाला वेग

पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवरील खड्डे येत्या दोन दिवसांत बुजविण्यासाठी कार्यवाही सुरू झाली आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी याविषयीचे निर्देश दिले आहेत. रस्ते, पदपथ, रेलिंग, दुभाजक आणि नागरिकांच्या सुरक्षेसी संबंधित सार्वजनिक सुविधांच्या दुरुस्तीचे निर्देश देण्यात आले आहेत. कामांमध्ये दिरंगाई केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. शहरातील रस्त्यांची पाहणी करून खड्डे दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश सर्व विभागीय अभियंते, उपअभियंते आणि कनिष्ठ अभियंत्यांना देण्यात आल्या आहेत. तर जळगाव शहरात स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. प्रशासन काहीच कारवाई करत नसल्याने बसचालकांनी स्वतः हे खड्डे बुजवले आहे.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता