
सातपुड्याच्या पर्वत रांगांमध्ये पर्यटकांना वाघोबाचे दर्शन झाले. तेव्हा त्यांना फोटो काढण्याचा मोह आवरला नाही.

पट्टेदार असा हा वाघ अकोल्यातील पर्यटकांच्या जंगल सफारी गाडीच्या अगदी जवळ होता. बांबूच्या रांजीजवळून जात होता.

रांजीच्या (बांबू) आड लपलेल्या या वाघाचे पट्टे दिसत होते. ते पाहून पर्यटक आनंदित झाले.

त्यानंतर या वाघोबाने बैठक मारली. तेव्हा तो ऐटदार दिसत होता.

शेवटी या वाघाने प्रस्थान केले. जंगलात निघून गेला नि दिसेनासा झाला.