कार्तिक वारी पूर्ववत करण्यासाठी अखिल भाविक वारकरी मंडळाची मागणी

| Updated on: Oct 23, 2021 | 11:17 AM

कोरोना महामारीमुळे सध्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या सर्व परंपरांवर निर्बंध घालण्यात आले होते. ते सर्व निर्बंध आता शिथिल करुन महाराष्ट्रातील सर्व वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असणारे वारी आणि वारकरी परंपरेतील कार्तिकी वारी सध्या पूर्ववत सुरु करण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे या पद्धतीचा निवेदन अखिल भाविक वारकरी मंडळाच्या देण्यात आला आहे.

कार्तिक वारी पूर्ववत करण्यासाठी अखिल भाविक वारकरी मंडळाची मागणी
Demand For Kartik Wari
Follow us on

सोलापूर : कोरोना महामारीमुळे सध्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या सर्व परंपरांवर निर्बंध घालण्यात आले होते. ते सर्व निर्बंध आता शिथिल करुन महाराष्ट्रातील सर्व वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असणारे वारी आणि वारकरी परंपरेतील कार्तिकी वारी सध्या पूर्ववत सुरु करण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे या पद्धतीचा निवेदन अखिल भाविक वारकरी मंडळाच्या देण्यात आला आहे.

यंदाची कार्तिक वारी आम्ही करणारच, असा निर्धार वारकरी मंडळींनी केलेला आहे. त्याच बरोबर दिंड्या, पालखी सोहळा पूर्ववत करुन पंढरपूर येथील 65 एकरमध्ये असणारे सर्व सोयीसुविधा आणि त्या ठिकाणी उपलब्ध असलेली जागा वारकऱ्यांना देण्यात यावी. चंद्रभागा नदीचे स्नान, पंढरपूर नगर प्रदक्षिणा, वारकरी संप्रदायाच्या सर्व परंपरा करण्यासाठी अधिकृत परवानगी देऊन सहकार्य करावे या पद्धतीचे निवेदन देण्यात आलेले आहे.

जर कार्तिक वारीला परवानगी नाही दिली तर अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आंदोलन उभे करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

कोजागिरी पौर्णिमा काळात 3 दिवस उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश बंदी

दुसरीकडे, कोजागिरी पौर्णिमा काळात 3 दिवस उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश बंदी लागू होती. कोजागिरी पौर्णिमेला महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यातून भाविक तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येत असतात. या काळात भाविकांची मोठी गर्दी होत असते. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात होणारी गर्दी टाळण्यासाठी कोजागिरी पौर्णिमा काळात 3 दिवस एकही वाहन किंवा भाविक जिल्हात येऊ दिला जाणार नाही, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं होते.

कोजागिरी पौर्णिमेपूर्वी एक दिवस आणि पौर्णिमेदिवशी आणि पौर्णिमेनंतर एक दिवस असे तीन दिवस तूळजापूर शहरात संचारबंदी, तर उस्मानाबाद जिल्हा सीमा बंदी लागू होती. या काळात जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करुन तिथे पोलीस आणि महसूल विभागाचे अधिकारी यांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आले होते.

संबंधित बातम्या :

Navratri 2021 | मानाच्या काठ्या तुळजापुरात दाखल, ‘आई राजा उदोउदो’ जयघोष करत मंदिर प्रदक्षिणा, वाचा ऐतिसाहिक महत्त्व

तुळजापूर: मंदिरात प्रशासनाचे नियम डावलल्याने भाजप नेत्यावर गुन्हा, उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई