Navratri 2021 | मानाच्या काठ्या तुळजापुरात दाखल, ‘आई राजा उदोउदो’ जयघोष करत मंदिर प्रदक्षिणा, वाचा ऐतिसाहिक महत्त्व

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र उत्सव सुरू आहे. तुळजाभवानी देवीच्या मानाच्या काठ्या या आता तुळजापूर येथे दाखल होत आहे.

Navratri 2021 | मानाच्या काठ्या तुळजापुरात दाखल, 'आई राजा उदोउदो' जयघोष करत मंदिर प्रदक्षिणा, वाचा ऐतिसाहिक महत्त्व
tuljabhavani

मुंबई : हिंदू धर्मात नवरात्रीचं विशेष महत्त्व आहे. नवरात्रीच्या नऊ दिवशी देवीच्या (Chaitra Navratri 2021) नऊ रुपांची पूजा केली जाते. या दरम्यान भक्त विधीवत देवी दुर्गाची पूजा करतात. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र उत्सव सुरू आहे. तुळजाभवानी देवीच्या मानाच्या काठ्या या आता तुळजापूर येथे दाखल होत आहे, सोलापूर येथून या मानाच्या काठ्या या तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन मंदिर प्रदक्षिणा करून परत जातात. यावेळी भाविक 25 ते 30 फूट उंच असलेली काठी खांद्यावर घेऊन 100 किमी अंतरावरून चालत येतात, वाद्यांच्या आवाजात आई राजा उदो उदोची घोषणा केली जाते.

कशी असते प्रदक्षिणा

मागील पाच वर्षांपासून दिडशे ते दोनशे काठे बांधव सोलापूर पासून तुळजाभवानी पर्यत पायी चालत येण्याची परंपरा आहे. या प्रदक्षिणेमध्ये काठे बांधव सोलापूवरुन आणलेली मानाची काठी आई तुळजाभवानीच्या मंदिराला प्रदक्षिणा घालतात. या प्रदक्षिणेला जिल्हाधिकारी यांच्याकडून संपूर्ण सहकार्य मिळते. अशी माहिती एका मानकऱ्याने दिला.

मानाची काठी म्हणजे नक्की काय ?

रामवाडी जगदंब हे एक देवीचं मंदिर आहे. या 80 वर्ष जुन्या मंदिराला ही काठीची परंपरा आहे. गेली अनेक वर्ष येथील भाविक मनोभावे मानाच्या काठ्या घेऊन आई तुळजभवानीच्या दर्शनाला येताता. 25 ते 30 फूट उंच काठ्यांना फुलांनी आणि पताकांनी सजवलेली असते. आईच्या जयघोषात ही काठी देवीच्या देवळात आणली जाते.

नवरात्रीचे महत्व

हिंदू पंचांगांनुसार, चैत्र महिन्याची सुरुवात झाली आहे. या महिन्यात चैत्र नवरात्रीचा (Chaitra Navratri) उत्सव साजरा केला जातो.7 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्र 2021 (Shardiya Navratri 2021) अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून सुरु झाली आहे. यावेळी नवरात्री आठ दिवसांची आहे. नवरात्रोत्सवात मातेच्या विविध 9 रुपांची पूजा केली जाते.

इतर बातम्या :

हा प्रभावशाली जप कराल तर आयुष्यातील सर्वांत मोठा अडथळा दूर होईल!

Chanakya Niti | देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचं आहे?, मग आजच करा ‘या’ गोष्टींचे त्याग

Margi Shani 2021 | या राशीच्या लोकांना पुढच्या 6 महिन्यात सगळं काही मिळेल, शनिदेवाची खास कृपा!

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI