मालवणचे उपनगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी हमरीतुमरीवर, वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, कारण काय?

| Updated on: Jun 16, 2021 | 10:10 AM

मालवणचे उपनगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी हमरीतुमरीवर आले होते. दोघांमध्ये बराच काळ वाद झाला. त्यांच्यातल्या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. (Deputy president and Chief Officer of Malvan controversy Video on Social Media)

मालवणचे उपनगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी हमरीतुमरीवर, वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, कारण काय?
मालवणचे उपनगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांमध्ये वाद
Follow us on

सिंधुदुर्ग : मालवणचे उपनगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी हमरीतुमरीवर आले होते. दोघांमध्ये बराच काळ वाद झाला. त्यांच्यातल्या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. मालवण शहरातील पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या गटार आणि खोदाई रखडल्याने शिवसेना-भाजप नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत थेट मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन त्यांना जाब विचारला. (Deputy president and Chief Officer of Malvan controversy Video on Social Media)

पालिका मुख्यालयात राडा

पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या गटार आणि खोदाई रखडल्याने शिवसेना-भाजप नगरसेवकांनी पालिका मुख्यालयात राडा केला. नगरसेवक आणि मुख्याधिकारी यांच्यातील चर्चेतून वाद वाढत गेला आणि थेट पोलिसांना पाचारण करण्यात आले. उपनगराध्यक्ष राजन वराडकर (Rajan Waradkar) आणि मुख्याधिकारी यांच्यात चांगलीच जुंपली. त्यामुळे पालिकेत वातावरण तंग बनले होते.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

मुख्याधिकाऱ्यांनी नगरसेवक-उपनगराध्यक्ष आणि त्यांच्यातला वाद स्वतः मोबाईलवर व्हिडीओ शूटिंग केले. अखेर पोलीस अधिकारी आल्यानंतर पाहणी करण्याच्या निर्णयाच्या वादावर पडदा पडला. मात्र मालवण नगरपालिकेतील या शाब्दिक बाचाबाचीचा व्हिडिओ वायरल झाल्याने काल या वादाचीच चर्चा जिल्ह्यात सर्वत्र केली जात होती.

(Deputy president and Chief Officer of Malvan controversy Video on Social Media)

पाहा व्हिडीओ :

हे ही वाचा :

Hingoli Accident | चौघा शिक्षकांच्या मृत्यूला कारणीभूत, हिंगोलीतील ‘त्या’ ठेकेदाराविरोधात गुन्हा

VIDEO | रॉयल एनफिल्डच्या शोरुमचे शटर वाकवून आत शिरला, बदलापुरात धाडसी चोरी