अजित पवारांमुळे 20 निवासी वसतीगृह मंजूर आणि ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी निधी : धनंजय मुंडे

| Updated on: Jun 18, 2021 | 6:05 PM

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारामुळे 20 निवासी वसतीगृह मंजूर झाल्याचं सांगितलं.

अजित पवारांमुळे 20 निवासी वसतीगृह मंजूर आणि ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी निधी : धनंजय मुंडे
Follow us on

बीड : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारामुळे 20 निवासी वसतीगृह मंजूर झाल्याचं सांगितलं. तसेच ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी गाळप होणाऱ्या उसामागे प्रतिटन 10 रुपये निधी आकारला जाऊन तो महामंडळाला दिला जाणार असल्याचीही माहिती दिली. बीड जिल्हा कोविड-19 आणि खरीप हंगामाचा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आढावा घेतला. त्यावेळी मुंडे बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपेही उपस्थित होते (Dhananjay Munde praise Ajit Pawar for approval of hostels and fund for sugar cane worker).

धनंजय मुंडे म्हणाले, “कोरोना संसर्गाच्या महामारीमध्ये उद्भवलेल्या अभूतपूर्व संकटात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची बीड जिल्ह्याला फार मोठी मदत झाली आहे. त्यांचे जिल्ह्यातील सर्व जनतेच्यावतीने पालकमंत्री म्हणून आभार मानतो. कोविड संकटाबरोबरच जिल्ह्यातील ऊसतोड मजूर त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्यशासनाने संत भगवानबाबा वसतीगृह योजनेला मंजुरी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारामुळे 20 निवासी वसतीगृह मंजूर झाली आहेत. ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी गाळप होणाऱ्या उसा मागे प्रतिटन 10 रुपये निधी आकारला जाऊन तो महामंडळास दिला जाईल.”

“खरीप हंगामातील पीक कर्ज वाटप व्यवस्थित होण्यासाठी अजितदादांनी आदेश द्यावेत”

“खरीप हंगामातील पीक कर्ज वाटप व्यवस्थित होण्यासाठी अर्थमंत्री या नात्याने अजितदादांनी बँकांना आपल्या स्तरावरून आदेश द्यावेत. जुन्या व नवीन अशा पात्र असलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांला पीक कर्ज मिळावे, याचे योग्य नियोजन व्हावे. कोरोना संसर्गाची तिसरी लाट येणार आहे. या स्थितीसाठी जिल्ह्यातील आरोग्ययंत्रणा व प्रशासन सुसज्ज करण्यात आले आहे. जर दुर्दैवाने तिसरी लाट आलीच तर या लाटेच्या संकटात देखील चांगले काम करून यशस्वी मुकाबला करू,” असंही पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं.

हेही वाचा :

Video : अजित पवारांकडून उस्मानाबादेत माणुसकीचं दर्शन, मुसळधार पाऊस सुरु असल्याने ‘गार्ड ऑफ ऑनर’ नाकारला

Video : ‘अजित पवारांकडून हे अपेक्षित नव्हतं’, बीडमधील लाठीमाराच्या प्रकारानंतर पंकजा मुंडेंची टीका

कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीत लवकरच समावेश, विधिमंडळात ठराव मांडणार; धनंजय मुंडेंची मोठी घोषणा

व्हिडीओ पाहा :

Dhananjay Munde praise Ajit Pawar for approval of hostels and fund for sugar cane worker