पाच किलो साखरेपेक्षा पाणी दिलं असतं तर…दुष्काळग्रस्तांना दिवाळी किट वाटपावरून तानाजी सावंत यांच्यावर या नेत्याची जहरी टीका
Tanaji Sawant Diwali Kit Dharashiv: शिंदे सेनेकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून दिवाळी किटचे वाटप करण्यात येत आहे. पण मदत करत आहात की जाहिरात असा सवाल विचारल्या जात आहे. माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांच्यावर या नेत्याने जहरी टीका केली आहे.

Raviraj Sable on Tanaji Sawant: राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी आणि त्यांना अन्नधान्याची मदत व्हावी यासाठी शिंदे सेनेने दिवाळी कट वाटप सुरू केले आहे. पण शेतकऱ्यांना मदत करत आहात की तुमची जाहिरात करत आहात? असा सवाल शेतकऱ्यांसह काही नेत्यांनी विचारला आहे. माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांनी सुद्धा धाराशिवकडे असे टेम्पो रवाना केले आहेत. त्यांच्यावर आता मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील उमेदवार रविराज साबळे यांनी जहरी टीका केली आहे.
जाहिरात करताय की मदत-रविराज साबळे यांची टीका
जाहिरात बाजी करत दुष्काळग्रस्तांना दिवाळी किटचे वाटप होणार आहे. शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्याकडून मोठे मोठे बॅनर लावून पुण्यातून मतदारसंघाकडे टेम्पो रवाना झाला आहे, असे सांगत मतदार संघातून सावंतावर टिकेची झोड, दिवाळी किट जाहिरात करण्यासाठी देताय का? रविराज साबळे यांनी सवाल केला आहे. त्यांनी मदतीवरून सावंत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
पाच किलो साखरेपेक्षा पाणी दिलं असतं तर…
आश्वासन दिलेलं पाणी तुम्ही मतदारसंघात आणला असतं तर आम्हाला तुमच्या पाच किलो साखरेची गरज लागली नसती, असा टीका रविराज साबळे यांनी केली. दिवाळी किटच्या बॉक्स वरील जाहिरातीमुळे तानाजी सावंत यांच्यावर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची नाराजी आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टीमध्येही मदत वाटपाची जाहिरातबाजी केली होती . दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याची चर्चा होती. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत आणि चारा-पाण्याची गरज असताना किटच्या जाहिरातबाजीवरून नाराजीचा सूर असल्याचा आरोप रविराज साबळे यांनी केला आहे.
तर शिवसेना स्टाईलने उत्तर देणार -तानाजी सावंत
दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना बँका आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांनी कर्जवसुलीसाठी तगादा लावून त्रास देऊ नये. परंडा विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना कर्जाच्या वसुलीसाठी त्रास दिल्यास शिवसेना स्टाईलने उत्तर देण्यात येईल असा इशारा आमदार डॉ. तानाजी सावंत यांनी दिला. भूम तालुक्यातील आंबी येथे बांधावर जात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.