आनंदाची बातमी, महाराष्ट्रातील ‘हा’ जिल्हा कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर

| Updated on: Aug 10, 2021 | 7:40 AM

Coronavirus | तीन दिवसांपूर्वीच राज्य सरकारकडून भंडारा जिल्हा कोरोनामुक्त झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. भंडाऱ्यातील शेवटच्या कोरोना रुग्णाला रविवारी डिस्चार्ज देण्यात आला होता.

आनंदाची बातमी, महाराष्ट्रातील हा जिल्हा कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर
कोरोना
Follow us on

मुंबई: राज्यातील कोरोनाची दुसरी लाट आता पूर्णपणे ओसरल्याचे संकेत मिळू लागले आहेत. कारण भंडाऱ्यापाठोपाठ धुळे आणि नंदुरबार हे जिल्हेही कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे. राज्यातील आरोग्य विभागाच्या ताज्या आकडेवारीत ही बाब समोर आली. तसे घडल्यास राज्यासाठी हा मोठा दिलासा ठरेल.

तीन दिवसांपूर्वीच राज्य सरकारकडून भंडारा जिल्हा कोरोनामुक्त झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. भंडाऱ्यातील शेवटच्या कोरोना रुग्णाला रविवारी डिस्चार्ज देण्यात आला होता. आरोग्य विभागातील कर्मचारी-डॉक्टरांचे प्रयत्न, ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या नीतीमुळे भंडारा जिल्हा कोरोना मुक्त झाला आहे. भंडाऱ्यात गेल्या वर्षी 27 एप्रिल रोजी गरदा बुद्रुकमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता, अशी माहिती त्यांनी दिली. शुक्रवारी जिल्ह्यातील शेवटच्या कोरोना रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिली होती.

गेल्या 24 तासांत राज्यात कोरोनाच्या 4405 नव्या रुग्णांची नोंद

मुंबईत सोमवारी दिवसभरात कोरोनाचे 208 रुग्ण सापडले होते. दुसऱ्या लाटेतील ही सर्वाधिक कमी रुग्णसंख्या आहे. यापूर्वी 26 जुलैला 299 तर 20 जुलैला मुंबईत 351 रुग्ण सापडले होते. तर राज्यातील कोरोना रुग्णांची संख्याही पाच हजारांच्या खाली आली. काल दिवसभरात राज्यात 4405 रुग्ण सापडले. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्क्यांवर पोहोचले आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी 1680 दिवसांवर पोहोचला आहे.

मुंबईत लोकल ट्रेन प्रवासासाठी अ‍ॅप दोन दिवसांत सुरु होणार

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल ट्रेनने प्रवास करता यावा, यासाठी खास अ‍ॅपचा वापर केला जाणार आहे. राज्य सरकारकडून तयार करण्यात येणाऱ्या या अ‍ॅपचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे अ‍ॅप येत्या दोन दिवसांत कार्यरत होईल. मुंबईतील 65 रेल्वे स्थानकांवर या अ‍ॅपच्या माध्यमातून तिकीट-पाससाठी क्युआर कोड दिला जाईल. तर वॉर्ड स्तरावर ऑफलाईन सेवेच्या माध्यमातून तिकिटासाठी क्युआर कोड मिळवता येईल.

संबंधित बातम्या  

ठाण्यात डेल्टा प्लसचा शिरकाव, 4 रुग्ण आढळल्याने चिंता वाढली

मुख्यमंत्र्यांनी लोकलचा सोपा प्रश्न अवघड केला, परवानगी देताना नवे अडथळे निर्माण केल्याचा भाजपचा आरोप

‘ज्यांना अधिकार नाही ते फक्त बोलण्यासाठी मंत्री’, लोकलच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचा रावसाहेब दानवेंवर निशाणा