जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी ई-पास बंधनकारक, जमावबंदी, संचारबंदी लागू; जाणून घ्या जालना जिल्ह्यात काय सुरु काय बंद ?

| Updated on: Jun 27, 2021 | 4:31 PM

जालना जिल्ह्यातील कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी आजपासून (27 जून) सकाळी 5 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जमावबंदी तर संध्याकाळी 5 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे.

जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी ई-पास बंधनकारक, जमावबंदी, संचारबंदी लागू; जाणून घ्या जालना जिल्ह्यात काय सुरु काय बंद ?
लॉकडाऊन प्रतिकात्मक फोटो
Follow us on

जालना : जालना जिल्ह्याचा दैनंदिन पॉझिव्हिटी रेट हा फक्त 0.48 एवढा आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी आता तिसऱ्या लाटेचा धोका समोर उभा ठाकला आहे. यामुळे जालना जिल्ह्यातील कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी आजपासून (27 जून) सकाळी 5 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जमावबंदी तर संध्याकाळी 5 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. तसेच सोमवार ते शुक्रवार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, आस्थापना 4 वाजेपर्यंत खुल्या असतील. मात्र शनिवार आणि रविवार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद राहणार आहेत. पुढील आदेश येईपर्यंत हे आदेश लागू असतील असे जालना जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सांगितले आहे. (E-pass is necessary to enter in Jalna district know new Corona rules)

अंत्यविधीसाठी वीस तर लग्नविधीसाठी 50 लोकांना जमण्यास मुभा

शनिवर, रविवार या दोन दिवसात पार्सल सेवा किंवा घरपोच सेवा उपलब्ध असणार असणार आहेत. अंत्यविधीसाठी 20 जणांना जमण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच लग्न समारंभाला कोरोनाचे नियम पाळून 50 लोकांना एका जागेवर जमा होता येईल.

मॉल, सिनेमागृहे, नाट्यगृहे पूर्णपणे बंद

शासकीय कार्यालये 50 % क्षमतेने सुरु राहणार असून कर्मचाऱ्यांना ओळखपत्र सोबत बाळगावे लागणार आहे. मॉल, सिनेमा हॉल, नाट्यगृहे या काळात पूर्णपणे बंद असणार आहेत. सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे नागरिकांसाठी बंद राहतील. परंतु धार्मिक सेवा करणाऱ्यांना प्रार्थना स्थळांमध्ये सेवा देता येईल.

बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्यांना ई-पास बंधनकारक

कृषी व कृषिसेवेला पूरक सेवा देणारी दुकाने 4 वाजेपर्यंत खुले राहतील. व्यायाम शाळा, केशकर्तनालाये, ब्युटी पार्लर 4 वाजेपर्यंत खुले राहतील. कोरोनाचे नियम पाळून मालवाहतूक सुरू राहील. बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्यांना ई-पास बंधनकारक असणार आहे.

तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कोरोनाचे नियम पाळणे, मास्कचा वापर करणे, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक करण्याची जवाबदारी जिल्हा परिषद, पोलीस विभाग, नगरपरिषद, नगर पंचायतचे मुख्याधिकारी यांच्यावर असणार आहे.

इतर बातम्या :

Maharashtra Coronavirus LIVE Update : औरंगाबादेत सुट्टीच्या दिवशी लसीकरण केंद्रावर तुफान गर्दी

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका, पण नवी मुंबईत अनेक नागरीक लसीकरणापासून वंचित

ठाण्यातील झोपडपट्टीत लसीकरणासाठी मोबाईल व्हॅन्स फिरवणार, घराजवळच मिळणार कोरोना लस

(E-pass is necessary to enter in Jalna district know new Corona rules)