ठाण्यातील झोपडपट्टीत लसीकरणासाठी मोबाईल व्हॅन्स फिरवणार, घराजवळच मिळणार कोरोना लस

Covid Vaccination | या कोविड-19 मोबाईल लसीकरण सेंटरमध्ये 1 वैद्यकीय अधिकारी, 1 व्हॅक्सिनेटर, 2डेटा ऑपरेटर, आणि एका निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

ठाण्यातील झोपडपट्टीत लसीकरणासाठी मोबाईल व्हॅन्स फिरवणार, घराजवळच मिळणार कोरोना लस
कोरोना लसीकरण
Follow us
| Updated on: Jun 26, 2021 | 12:42 PM

ठाणे: ठाणे शहरातील झोपडपट्टी परिसरात लसीकरण प्रक्रियेला वेग देण्यासाठी आता पालिकेने 4 मोबाईल लसीकरण सेंटर्सची व्यवस्था केली आहे. त्यामुळे झोपडपट्टी परिसरातील नागरिकांना घराजवळच लस (Covid Vaccine) उपलब्ध होणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे. (Covid vaccination mobile centers in Thane City)

शहरातील झोपडपट्टी तसेच चाळीमध्ये राहणारे नागरिक लसीकरणापासून वंचित राहू नये तसेच इतर लसीकरण केंद्रावर ये-जा करणे शक्य नसणाऱ्या नागरिकांना त्यांच्या घराजवळच लस देण्याबाबत केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शन सुचेनेनुसार ठाणे महापालिकेच्यावतीने 4 कोविड-19 मोबाईल लसीकरण सेंटर्स सुरू करण्यात आली आहेत. या कोविड-19 मोबाईल लसीकरण सेंटरमध्ये 1 वैद्यकीय अधिकारी, 1 व्हॅक्सिनेटर, 2डेटा ऑपरेटर, आणि एका निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

शहरातील झोपडपट्टी परिसरासोबत इतर विविध ठिकाणी दररोज दुपारी 11 ते 3 या वेळेत नागरिकांना त्यांच्या घराजवळ पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे. यासाठी दररोज वेळापत्रक निश्चित करून लसीकरणाची ठिकाणे जाहीर करण्यात येणार आहे. आज ठाण्यातील सावरकरनगर, खारटन रोड, गांधी नगर कोपरी कॉलनी आणि साठेवाडी नौपाडा या ठिकाणी लसीकरण करण्यात येणार असून नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

ठाण्यातील निर्बंध पुन्हा वाढले

ब्रेक द चेन अंतर्गत राज्य शासनाने ठिकठिकाणी लागू केलेले निर्बंध आता पुन्हा बदलले असून संपूर्ण राज्यात निर्बंधाचा एकच स्तर म्हणजे तिसरा स्तर लागू करण्यात आला आहे.कोरोनाच्या डेल्टा प्लस या नवीन प्रकारामुळे सर्व राज्यभर स्तर 3 चे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.हे आदेश 28 जूनपासून 5जुलैपर्यंत लागू राहतील.

संबंधित बातम्या:

Thane Coronavirus: ठाणे जिल्हा पुन्हा तिसऱ्या लेव्हलमध्ये; मॉल-थिएटर्सला पुन्हा टाळं, निर्बंधांमध्ये वाढ

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 50 हजारांच्या खाली, कोरोनाबळींत घट

मोठी बातमी, स्पुटनिक वी लस पुण्यात दाखल, पुणेकरांना ‘या’ तारखेपासून लस मिळणार

(Covid vaccination mobile centers in Thane City)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.