AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्पुतनिकचा एक डोस हजाराच्या घरात, कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनची किंमत किती?

रशियाची स्पुतनिक लस भारतात आली आणि या लसीचा पहिला डोसही देण्यात आलाय.

स्पुतनिकचा एक डोस हजाराच्या घरात, कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनची किंमत किती?
स्पुतिक वी लस
| Updated on: May 14, 2021 | 10:04 PM
Share

मुंबई : रशियाची स्पुतनिक लस भारतात आली आणि या लसीचा पहिला डोसही देण्यात आलाय. हैदराबादमधील डॉ. रेड्डीज लॅबमध्ये रेड्डीज लेबॉरेटरीजच्या कस्टम फार्मा सर्विसेसचे दीपक सापरा यांना पहिला डोस देण्यात आलाय. भारतात स्पुतनिक लस डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या माध्यमातूनच आयात करण्यात आलीय. तसंच आता या लसीची किंमतही जाहीर करण्यात आलीय (Special report on prices of Sputnik Covishield and Covaxin Vaccine in India).

स्पुतनिक लसीची किंमत किती?

स्पुतनिक लसीची किंमत ही 948 रुपये आहे. त्यावर जीएसटी 5 टक्के म्हणजे एक लस 995 रुपयांना पडणार आहे. याचाच अर्थ स्पुतनिकचा एक डोस हजार रुपयांच्या घरात जाणार. याही लसीचे 2 डोस घेणं बंधनकारक आहे. म्हणजेच दोन डोससाठी या लसीला 1990 रुपये खर्च येईल.

भारतात किती कोरोना लस उपलब्ध?

भारतात सध्या 3 लसी आहेत. भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन राज्य सरकारांना 400 रुपयांना मिळते. सीरम इन्स्टिट्युटची कोव्हिशील्ड राज्य सरकारला 300 रुपयात मिळतेय. स्पुतनिक मात्र 995 रुपयांना मिळणार आहे. रशियाची स्पुतनिक महाग आहे, पण भारतात लसीचं उत्पादन सुरु झाल्यानंतर स्पुतनिक लसीची किंमतही कमी होईल, असं सांगितलं जातंय. जुलैपासून भारतात स्पुतनिकचं उत्पादन होईल अशी घोषणा नीती आयोगानं केलेली आहे. सध्या रशियाहून 1 मे रोजी भारतात दीड लाख स्पुतनिकचे डोस आलेत, अशी माहिती नीती आयोगाच्या डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिलीय.

स्पुतनिक व्ही लस किती प्रभावी?

स्पुतनिक व्ही लस किती प्रभावी आहे, त्यावरही एक नजर टाकुयात. सायन्स जर्नल असलेल्या द लँसेटमध्ये या लसीचे शेवटच्या टप्प्यातील निष्कर्ष घोषित करण्यात आले आहेत. त्यानुसार स्पुतनिक व्ही लस कोरोनाविरुद्ध तब्बल 92 टक्के प्रभावी आहे. मॉस्कोतील गॅमालिया इन्स्टिट्युटद्वारे ही लस विकसित करण्यात आलीय. या लसीचे ट्रायल होण्याआधीच रशियात या लसीला मंजुरी मिळाली होती. त्यामुळे ही लस वादातही सापडली होती. मात्र, आता ही लस अत्यंत प्रभावी असल्याचं समोर आलं आहे.

ही लस विकसित करण्यासाठी सर्दीच्या विषाणूचा वापर करण्यात आला आहे. स्पुतनिक व्ही लसीला एकूण 55 देशांमध्ये मान्यता देण्यात आलीय. स्पुतनिक लसीचा पहिला डोस दिल्यानंतर 21 दिवसांनीच दुसरा डोस दिला जातो. 2 ते 8 अंश सेल्सिअस तापमानातही साठवता येते. त्यामुळं भारतासारख्या उष्ण तापमानाच्या देशात ही यशस्वी ठरु शकते. देशात लसीचा तुटवडा आहे. त्यात स्पुतनिक लस आल्यानं देशभरातल्या लसीकरण मोहिमेला चांगलाच हातभार लागणार आहे.

हेही वाचा :

धक्कादायक, भारतात श्रीमंत आणि शक्तीशाली लोकांकडून धमक्या, अदर पुनावालांकडून भारताबाहेर लस उत्पादनाचा विचार

अमेरिकेनं भारताचं ‘रॉ’ मटेरियल रोखलं, चीननं डिवचलं, तीन देश, एक कार्टून, वाचा सविस्तर

व्हॅक्सीनचा दुसरा डोस इतर राज्यात घेता येतो का?; ‘या’ पाच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहीतच हवेत

व्हिडीओ पाहा :

Special report on prices of Sputnik Covishield and Covaxin Vaccine in India

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.