व्हॅक्सीनचा दुसरा डोस इतर राज्यात घेता येतो का?; ‘या’ पाच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहीतच हवेत

संपूर्ण देशात कोरोना लसीकरण जोरात सुरू आहे. आता तर 45 वर्षांवरील व्यक्तिंनाही लस देण्यात येत आहे. (Is 2nd covid vaccine dose necessary? When should I take it?)

व्हॅक्सीनचा दुसरा डोस इतर राज्यात घेता येतो का?; 'या' पाच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहीतच हवेत
सांकेतिक फोटो

नवी दिल्ली: संपूर्ण देशात कोरोना लसीकरण जोरात सुरू आहे. आता तर 45 वर्षांवरील व्यक्तिंनाही लस देण्यात येत आहे. अनेकांनी व्हॅक्सीनचा पहिला डोस घेतला आहे. तर अनेकजणांनी दुसरा डोस घेतला आहे. मात्र, ज्यांनी पहिला डोस घेतला त्यांच्या मनात दुसऱ्या राज्यात डोस घेऊ शकतो का? यासारखे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. नागरिकांच्या मनातील या प्रश्नांचा घेतलेला हा आढावा. (Is 2nd covid vaccine dose necessary? When should I take it?)

इतर राज्यात दुसरा डोस घेऊ शकतो का?

होय. तुम्ही कोणत्याही राज्यात गेल्यावर कोरोना व्हॅक्सीनचा दुसरा डोस घेऊ शकतो. मात्र, तुम्ही कोविशील्ड किंवा कोव्हॅक्सीन यापैकी जी लस घेतली आहे तीच लस इतर लसीकरण केंद्रावर उपलब्ध असेल तर तुम्ही लस घेऊ शकता. पहिला डोस घेतल्यानंतर तुम्हाला एक स्लिप मिळते. त्यावर तुम्ही पहिली व्हॅक्सिन कोणती घेतली आहे, तिचं नाव असतं.

व्हॅक्सीनचा दुसरा डोस आवश्यक आहे का?

होय. आवश्यक आहे. भारतात सिंगल डोस व्हॅक्सिनचा वापर होत नाही. कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सीन या पैकी कोणत्याही एका लसीचे दोन डोस घेणं आवश्यक आहे. तरच लसीकरणाचा फायदा होतो. मात्र, दोन्ही डोस एकाच प्रकारच्या व्हॅक्सीनचे असले पाहिजे.

व्हॅक्सीनचा दुसरा डोस कधी घेतला पाहिजे?

पहिली लस घेतल्यानंतर 4 ते 6 आठवड्यात दुसरी लस घेतली पाहिजे. कोविशिल्डबाबत ही वेळेची मर्यादा 4 ते 8 तासंची आहे.

को-विन सिस्टिम किंवा आरोग्य सेतू अॅपने आपोआप दुसऱ्या डोससाठी अपॉइंटमेंट मिळेल का?

नाही. दुसऱ्या डोससाठी तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. को-विन सिस्टिमद्वारे तुम्हाला व्हॅक्सिनेशन सेंटरमधून अपॉइंटमेट मिळण्यास मदत मिळेल. तुम्ही पहिला डोस ज्या ठिकाणी घेतला त्याच सेंटरची अपॉइंटमेंट मिळेल.

तुम्हाला कोणती व्हॅक्सीन हवी हे तुम्ही निवडू शकता का?

नाही. सर्व व्हॅक्सीन सुरक्षित आहेत. त्यात निवडीचा पर्याय देण्यात आलेला नाही. (Is 2nd covid vaccine dose necessary? When should I take it?)

 

संबंधित बातम्या:

Uddhav Thackeray On Maharashtra Lockdown LIVE : थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह

Sharad Pawar: सुप्रिया सुळेंनी शरद पवारांवरील दुसऱ्या शस्त्रक्रियेनंतर पोस्ट केला फॅमिली फोटो, म्हणाल्या…

Maharashtra corona guidelines : रेल्वे-बसमध्ये कोणाला प्रवेश, कोणती दुकानं सुरु राहू शकतात? काय-काय सुरु असेल

(Is 2nd covid vaccine dose necessary? When should I take it?)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI