पावसा अभावी शेतातलं पीक सुकू लागलं, कर्ज कसं फेडणार? भंडाऱ्यात चिंतेनं शेतकऱ्याची आत्महत्या

| Updated on: Aug 18, 2021 | 4:39 PM

शेतीतून पुरेसं उत्पन्न न मिळाल्यानं कर्जबाजारी होऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या अनेक घटना झाल्यात. मात्र, पेरणीच्या सुरुवातीलाच पीक येण्याची शक्यता दिसत नसल्याने एका शेतकऱ्यानं भरदिवसा गळफास घेऊन शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय.

पावसा अभावी शेतातलं पीक सुकू लागलं, कर्ज कसं फेडणार? भंडाऱ्यात चिंतेनं शेतकऱ्याची आत्महत्या
Follow us on

भंडारा : शेतीतून पुरेसं उत्पन्न न मिळाल्यानं कर्जबाजारी होऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या अनेक घटना झाल्यात. मात्र, पेरणीच्या सुरुवातीलाच पीक येण्याची शक्यता दिसत नसल्याने एका शेतकऱ्यानं भरदिवसा गळफास घेऊन शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात तावशी येथे ही घटना घडली. अशोक सिताराम वालदे (वय 62 वर्ष, रा. तावशी) असं आत्महत्या करणाऱ्या मृत शेतकऱ्याचं नाव आहे.

या शेतकऱ्यानं यंदाच्या खरीप हंगामात विविध प्रकारे कर्ज घेऊन शेतात विविध पिकांची लागवड केली. मात्र, गत काही दिवसांपासून पावसा अभावी शेतातलं पिक नष्ट झालं. यामुळे आता कर्ज कसं फेडावं या भीतीनं तणावात आलेल्या 62 वर्षीय शेतकऱ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली.

कर्ज कसं फेडावं या चिंतेत शेतकऱ्याची आत्महत्या

मृत शेतकऱ्याची गावात एक एकर आणि अतिक्रमणातील 1 एकर अशी एकूण 2 एकर शेतजमीन आहे. यंदाच्या खरिपात या शेतजमिनीत विविध पीक लागवडीसाठी या शेतकऱ्यांनं पीक कर्जाची उचल केली. मात्र, गत काही दिवसांपासून तालुक्यात पाऊस होत नसल्यानं पिक पावसा अभावी सुकू लागल्यानं कर्ज कसं फेडावं या चिंतेत शेतकरी होता.

दरम्यान, स्वमालकीच्या घरासमोर जांभळीच्या झाडाला गळफास लावून शेतकऱ्यानं घेत आत्महत्या केली. या घटनेची माहिती पोलिसांना होताच तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा करण्यात आला. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या घटनेची नोंद पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.

हेही वाचा :

‘एक गाव ज्याचं शेतकरी आत्महत्याग्रस्त असं नाव’, आतापर्यंत 30 शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली

गेल्या 3 वर्षात किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, महाराष्ट्रात किती शेतकऱ्यांनी जीवन संपवलं? केंद्रीय कृषीमंत्री काय म्हणाले?

बळीराजाचे पैसे परस्पर लाटले, कर्ज फेडण्यासाठी तगादा; शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर बँकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा

व्हिडीओ पाहा :

Farmer suicide in Bhandara due to crop loss