गेल्या 3 वर्षात किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, महाराष्ट्रात किती शेतकऱ्यांनी जीवन संपवलं? केंद्रीय कृषीमंत्री काय म्हणाले?

भारतात शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न फार गंभीर आहे. शेतकरी आत्महत्येच्या मुद्यावरुन मोठ्या प्रमाणावर राजकारण केलं जातं.

गेल्या 3 वर्षात किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, महाराष्ट्रात किती शेतकऱ्यांनी जीवन संपवलं? केंद्रीय कृषीमंत्री काय म्हणाले?
शेतकरी
Follow us
| Updated on: Jul 27, 2021 | 11:41 PM

नवी दिल्ली: भारतात शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न फार गंभीर आहे. शेतकरी आत्महत्येच्या मुद्यावरुन मोठ्या प्रमाणावर राजकारण केलं जातं. विरोधी पक्ष सातत्यानं सरकारवर शेतकऱ्यांसाठी काय केलं, अशा स्वरुपाच्या प्रश्नांची सरबत्ती करत असतो. केंद्र सरकारनं 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं यापूर्वी जाहीर केलं आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात देखील शेतकरी आत्महत्येचा मुद्दा उपस्थित झाला आहे. लोकसभा खासदार कृष्णपाल सिंह यादव यांनी केंद्र सरकारला गेल्या तीन वर्षातील शेतकरी आत्महत्येची संख्या जाहीर करावी, अशी मागणी केली होती. केंद्र सरकार शेतकरी आत्महत्येचं काही रेकॉर्ड ठेवते का? असं देखील विचारण्यात आलं होतं, त्यावर केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी गृह मंत्रालयाकडील राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरो म्हणजेच एनसीआरबी अपघात आणि आत्महत्यांसदर्भात माहिती जतन करते, अशी माहिती दिली आहे.

NCRB ची माहिती नेमकी काय?

केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी एनसीआरबीनं 2019 पर्यंतचा अहवाल प्रसिद्ध केल्याची माहिती दिली. त्या अहवालात 2017 ते 2019 पर्यंतच्या घटनांची माहिती आहे. रिपोर्टमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची माहिती देण्यात आलेली नाही. कर्जाच्या बोझ्यात दबल्यानं शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करत असल्याचं समोर आलं आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या

केंद्र सरकारला एनसीआरबीनं दिलेल्या माहितीनुसार सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. गेल्या तीन वर्षात सर्वात जास्त आत्महत्यांचा आकडा माहाराष्ट्रात आहे. 2019 मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 2680 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. 2017 मध्ये ही संख्या 2426 होती. कर्नाटक दुसर्‍या क्रमांकावर आहे जिथे 2019 मध्ये 1331 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. तेलंगणामध्ये 2019 मध्ये 491 आणि 2017 मध्ये 846 शेतकर्‍यांनी आत्महत्या केली.

पंजाबमध्ये 2019 मध्ये 239 आणि 2017 मध्ये 243 शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. मध्य प्रदेशात 2019 मध्ये 142 आणि 2017 मध्ये 429 शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. आंध्र प्रदेशात, 2019 मध्ये 628 आणि 2017 मध्ये 375 शेतकर्‍यांनी आपले जीवन संपवले. सरकारच्या म्हणण्यानुसार, 2017 मध्ये देशभरात 5955 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या, 2018 मध्ये 5763 आणि 2019 मध्ये 5957 शेतकर्‍यांनी आत्महत्या केली.

सरकारनं शेतकऱ्यांसाठी काय केल?

शेतकऱ्यांना त्यांच्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सरकारनं काय केलं असा प्रश्न विचारण्यात आला. जे शेतकरी कर्ज परतफेड करण्यास सक्षम नाहीत त्यांच्यासाठी काय करत असल्याचं विचारलं होतं. त्यावर केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी 2008-09 मध्ये कर्जमाफी करण्यात आली होती, अशी माहिती दिली. त्यावेळी 3.73 कोटी शेतकऱ्यांच्या 52 हजार 259 कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

इतर बातम्या:

केंद्रीय कृषीमंत्र्यांनी जाहीर केलेले 701 कोटी नेमके कधीचे ? महाराष्ट्राचे कृषी मंत्री म्हणतात मदत गेल्यावर्षीच्या अतिवृष्टीची

केंद्र शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार का? देशातील शेतकऱ्यांवर किती कर्ज? केंद्रीय वित्त राज्यमंत्री काय म्हणाले?

How many farmers suicide in last 3 year agriculture minister gave reply in parliament during monsoon session

Non Stop LIVE Update
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे.
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा.