AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकरी तब्बल सहा तास खड्ड्यात, आश्वासनानंतर नेमकं काय घडलं?

2020 सालच्या पीक विम्याच्या बाबतीत कंपनीनं पीक विम्याचं नुकसान भरपाई द्यायला नकार दिला.

शेतकरी तब्बल सहा तास खड्ड्यात, आश्वासनानंतर नेमकं काय घडलं?
आश्वासनानंतर नेमकं काय घडलं? Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Oct 27, 2022 | 6:03 PM
Share

उस्मानाबाद : खासदार ओमराजे निंबाळकर यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागलं. शेतकऱ्यांना पीकविमा आणि अनुदानाचे पैसे मिळावे, या मागणीसाठीचे शेतकऱ्यांचे आंदोलन पेटताना दिसत आहे. आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. खासदार स्वतः रस्त्यावर उरतले आहेत. सोलापूर-औरंगाबाद रस्त्यावर चक्काजाम केला गेलाय. शिवसैनिकांनी रस्ता रोको आंदोलन केलंय.

2020 सालच्या पीक विम्याच्या बाबतीत कंपनीनं पीक विम्याचं नुकसान भरपाई द्यायला नकार दिला. 10 जून 2021 ला शिवसेना औरंगाबाद उच्च न्यायालयात गेली. खंडपीठानं नुकसान झाल्याचं सांगितलं. 40 टक्के नुकसान झालं असं गृहित धरून प्रती हेक्टरी 18 हजार रुपये नुकसान भरपाई विमा कंपनीनं मदत करावी, असा आदेश दिला, अशी माहिती खासदार निंबाळकर यांनी दिली.

कंपनी सर्वोच्च न्यायालयात गेली. उच्च न्यायालयाचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवलेत. तीन आठवड्यात हे पैसे जमा करावेत, असा आदेश होता. 532 कोटी रुपयांची विम्याची रक्कम होते.

200 कोटी रुपये दिले म्हणून सांगितले जाते. पण, अद्याप जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही. तर मग शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमाच झाले नाहीत. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेल्याचं खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले.

उस्मानाबाद जिल्ह्यातील सारोळा येथील आंदोलक शेतकऱ्यांना खड्ड्यातून बाहेर काढले. तहसीलदार गणेश माळी यांनी त्यांना आश्वासन दिलं. त्यामुळं शेतकरी बाहेर आले आहेत. तब्बल 6 तासानंतर 7 शेतकरी खड्ड्याबाहेर आलेत. त्यांनी पैसे जमा न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.