Chandrapur Fire : चंद्रपूरमधील सिंदेवाही येथे वन विभागाच्या लाकूड डेपोला आग, लाखोंचे नुकसान

दुपारनंतर उन्हाचा तडाखा असल्याने व वारा असल्याने आग पसरत गेली. अग्निशमनासाठी नगरपंचायत अग्निशामक दलाच्या गाडीला बोलविण्यात आले होते. या कामी सिंदेवाही नगरपंचायत, नगरपरिषद नागभीड, चिमूर, मूल येथील अग्निशमन पथक पाचारण करण्यात आले. लाकडांना बाजूला करण्याकरीता जेसीबीचा वापर करण्यात आला. मात्र डेपोमधील आग मोठ्या प्रमाणात पसरत असल्यामुळे हे प्रयत्न अपुरे पडले.

Chandrapur Fire : चंद्रपूरमधील सिंदेवाही येथे वन विभागाच्या लाकूड डेपोला आग, लाखोंचे नुकसान
| Edited By: | Updated on: Apr 17, 2022 | 7:41 PM

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथील वनविभागाच्या मध्यवर्ती काष्ट भंडाराला अचानक आग (Fire) लागल्याने डेपोमधील लाकडे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली आहेत. यात लाखो रुपयांचे नुकसान (Loss) झाले आहे. आगीचे रौद्ररूप बघता अग्निशामक दलाच्या चार गाड्यांनी आग विझविण्याकरीता युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. डेपोमधील धावडी, गराडी, सागवान लाकडाच्या बिटांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. शहरापासून जवळच 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या वनविभागाच्या डेपोला ही आग लागली. वनविभाग कर्मचाऱ्यांना हे लक्षात येताच तात्काळ उपलब्ध असलेल्या ब्लोअर मशीनद्वारे आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. (Fire at Forest Departments timber depot at Sindevahi in Chandrapur)

आगीत लाखो रुपयांच्या लाकडांचे नुकसान

दुपारनंतर उन्हाचा तडाखा असल्याने व वारा असल्याने आग पसरत गेली. अग्निशमनासाठी नगरपंचायत अग्निशामक दलाच्या गाडीला बोलविण्यात आले होते. या कामी सिंदेवाही नगरपंचायत, नगरपरिषद नागभीड, चिमूर, मूल येथील अग्निशमन पथक पाचारण करण्यात आले. लाकडांना बाजूला करण्याकरीता जेसीबीचा वापर करण्यात आला. मात्र डेपोमधील आग मोठ्या प्रमाणात पसरत असल्यामुळे हे प्रयत्न अपुरे पडले. डेपोला वणव्यामुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. वनविभाग काष्ट भंडारात पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने आग विझवण्यास अधिक वेळ लागत आहे. आगीत लिलाव व विक्रीस उपलब्ध असलेल्या लाकडाचे लाखांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन कर्मचारी व मजूरवर्ग आग विझविण्याचा अथक प्रयत्न करीत आहेत. (Fire at Forest Departments timber depot at Sindevahi in Chandrapur)

इतर बातम्या

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंनी आपल्या 12 वर्षाच्या मुलीच्या हाती दिलं गाडीचं स्टेअरिंग! आता गुन्हा दाखल करण्याची मागणी

सोनम कपूरच्या घरी नर्सने कशाप्रकारे केली अडीच कोटींची चोरी? पोलिसांनी सांगितली Modus Operandi