Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंनी आपल्या 12 वर्षाच्या मुलीच्या हाती दिलं गाडीचं स्टेअरिंग! आता गुन्हा दाखल करण्याची मागणी

अवघ्या 12 वर्षाची असलेल्या झेनच्या हातात सदावर्तेंनी आपल्या फॉर्च्युनर गाडीचं स्टेअरिंग दिलं. ठाणे ते दादर मार्गावर तीने गाडी चालवल्याचा आणि तिला सदावर्ते तिला प्रोत्साहन देत असलेला व्हिडीओ बारामतीतील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी ट्वीट केलाय. तसंच अल्पवयीन मुलीच्या हाती गाडी दिल्याबद्दल कारवाई करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केलीय.

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंनी आपल्या 12 वर्षाच्या मुलीच्या हाती दिलं गाडीचं स्टेअरिंग! आता गुन्हा दाखल करण्याची मागणी
गुणरत्न सदावर्तेंनी अल्पवयीन मुलीच्या हाती गाडीचं स्टेअरिंग दिलं
Image Credit source: Twitter
नविद पठाण

| Edited By: सागर जोशी

Apr 17, 2022 | 7:07 PM

बारामती : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व करणारे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) हे सध्या सातारा पोलिसांच्या कोठडीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार  (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी झालेल्या राड्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्या प्रकरणात न्यायलयीन कोठडी मिळाल्यानंतर सातारा पोलिसांनी (Satara Police) एका जुन्या प्रकरणात सदावर्तेंचा ताबा मिळवलाय. त्याचबरोबर कोल्हापूर, पुणे आणि बीडमध्येही सदावर्ते यांच्या विरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. अशावेळी सदावर्ते आता अजून अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण, त्यांची मुलगी झेन सदावर्तेचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. अवघ्या 12 वर्षाची असलेल्या झेनच्या हातात सदावर्तेंनी आपल्या फॉर्च्युनर गाडीचं स्टेअरिंग दिलं. ठाणे ते दादर मार्गावर तीने गाडी चालवल्याचा आणि तिला सदावर्ते तिला प्रोत्साहन देत असलेला व्हिडीओ बारामतीतील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी ट्वीट केलाय. तसंच अल्पवयीन मुलीच्या हाती गाडी दिल्याबद्दल कारवाई करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केलीय.

गाडी जप्त करण्याचीही मागणी

आपल्या अल्पवयीन 12 वर्षाच्या मुलीला लायसन्स नसतानाही हायवेवर गाडी चालवण्यास दिली. त्याद्वारे इतरांच्या जीवीतास धोका निर्माण करणाऱ्या ॲड. गुणरत्न सदावर्ते व गाडीमालक जयश्री पाटील यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा, अशी मागणी नितीन यादव यांनी पोलीस महासंचालक व गृहमंत्र्यांकडे केली आहे. तसेच संबंधित कारचा इन्शुरन्स संपला असल्याने वाहन कायदा अधिनियमानुसार शासनाने गाडी जप्त करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

सदावर्तेंचा ताबा सातारा पोलिसांकडे का?

गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने एका वृत्तवाहिनीवर बोलताना सदावर्ते यांनी उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती यांचा एकेरी उल्लेख करत बेताल वक्तव्य केलं होतं. पाटण तालुक्यातील कोंजवडेतील राजेश निकम यांनी त्याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. साधारण दीड वर्षापूर्वी दाखल असलेल्या या गुन्ह्यात त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. यामुळे सातारा पोलिसांनी सदावर्ते यांचा ताबा मागितला होता. त्यानुसार सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांकडे देण्यात आलाय.

इतर बातम्या :

Sadabhau Khot : चंद्रकांत पाटलांना अनेकांचा हिमालयात जाण्याचा सल्ला; आता सदाभाऊंनी पवारांनाही करुन दिली एका वक्तव्याची आठवण!

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंवर आणखी एक गुन्हा दाखल, बीडमधील प्रकरण काय?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें