Sangli Accident : सांगलीत कार आणि कंटेनरचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

या अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला. पुण्याहून सांगलीकडे निघालेल्या मार्गावर ही दुर्घटना घडली आहे. या अपघातात गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.

Sangli Accident : सांगलीत कार आणि कंटेनरचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू
| Edited By: | Updated on: Jun 04, 2022 | 7:44 PM

सांगली : सांगलीतील कासेगाव-पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गवर कासेगावजवळ आज कार (Car) व कंटनेरचा भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू (Death) झाला. मृतांपैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य तिघांचा रुग्णालयात नेत असताना उपचारापूर्वीच मृत्यू झाला. पुण्याहून सांगलीकडे निघालेल्या मार्गावर ही दुर्घटना घडली आहे. या अपघातात गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. अरिंजय आण्णासो शिरोटे, स्मिता अभिनंदन शिरोटे, सुनेशा अभिनंदन शिरोटे, विरु अभिनंदन शिरोटे अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. या अपघाताची कासेगाव पोलिसात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही.

कार कंटेनरवर धडकल्याने झाला अपघात

कराड तालुक्यातून पुढे गेल्यानंतर काही अंतरावर कासेगावजवळ हा भीषण अपघात झाला आहे. अपघातातील सर्व मृत व्यक्ती जयसिंगपूर येथील रहिवासी आहेत. या अपघातात अरिंजय आण्णासो शिरोटे, स्मिता अभिनंदन शिरोटे, सुनेशा अभिनंदन शिरोटे, विरु अभिनंदन शिरोटे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याबाबत कासेगाव पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहितीनुसार, कारमधून (एम एच- 14 डी. एन. 6339) मृत कुटुंब पिंपरी-चिंचवडहून जयसिंगपूरकडे निघाले होते. यावेळी कासेगाव जवळील येवलेवाडी फाटा येथे कार रस्त्याकडेला थांबलेल्या कंटेनरला (एमएच- 05- एएम- 3644) पाठीमागून जोरात धडकली. या अपघातात कारमधील 5 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये दोघांचा जागीच तर तिघांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करत असताना मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की, अपघातात कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला. गाडीचा वरील टप व दरवाजे पूर्णपणे तुटले. वरचा भाग पूर्णपणे उडाला. तर आतील सिटचा भागही तुटला. रस्त्यावर रक्ताचा सडा पडलेला होता. (Five members of the same family die in a car and container accident in Sangli)