महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला पोलिसांनी दिली मोठी बातमी; पोलिसांवरील हल्ल्यांनतर 3 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान

| Updated on: Apr 30, 2023 | 9:59 PM

छत्तीसगड सीमावर्ती भागातून महाराष्ट्र सीमावर्ती भागात काही नक्षलवादी प्रवेश केल्याची माहितीही पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे व सी 60 पोलीस पथकाकडून घनदाट जंगलात ऑपरेशन राबविणे सुरू करण्यात आले होते.

महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला पोलिसांनी दिली मोठी बातमी; पोलिसांवरील हल्ल्यांनतर 3 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
Follow us on

गडचिरोली : महाराष्ट्र दिनच्या आदल्या दिवशी गडचिरोली पोलिसांना एक मोठा यश मिळाल्याची घटना घडली आहे. गडचिरोली जिल्ह्यात नक्षल विरोधी पोलीस पथकाने तीन नक्षलवाद्यांना कंटास्नान घातल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. चार दिवसापूर्वी छत्तीसगड राज्यात  नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात दहा पोलीस शहीद झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता पोलिसांनी तीन नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातल्याचे पोलिसांकडून सागंण्यात आले आहे. भामरागड तालुक्यातील दामरेचा परिसरात आज सायंकाळी नक्षलवाद्यांबरोबर चकमक चालली होती. या तीन नक्षलवाद्यांवर जवळपास 38 लाख रुपये चे बक्षीस होते

या ठिकाणी नक्षलवादी प्रशिक्षण कॅम्प घेण्यासाठी जमा झाल्याची गुप्त माहितीच्या आधारे हे ऑपरेशन पोलिसांद्वारे राबविण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल विरोधी सी 60 पोलीस पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलविरोधी पोलीस पथकाकडून सातत्याने नक्षल ऑपरेशन राबविण्यात येत असते. त्यानंतर आज भामरागड तालुक्यातील मन्ने राजाराम दांमरेचा या भागात नक्षल विरोधी पोलीस सी-60 पोलीस पथकाकडून ऑपरेशन करीत असताना पोलिसांच्या हाती गुप्त माहिती मिळाली होती.

त्यानंतर छत्तीसगड सीमावर्ती भागातून महाराष्ट्र सीमावर्ती भागात काही नक्षलवादी प्रवेश केल्याची माहितीही पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे व सी 60 पोलीस पथकाकडून घनदाट जंगलात ऑपरेशन राबविणे सुरू करण्यात आले होते.

तर पोलिसांच्या तुकड्यांवर नक्षलवाद्यांकडून गोळीबार सुरू करण्यात आला होता. त्यावेळी प्रत्युत्तर दाखल नक्षल विरोधी पोलीस पथकाने गोळीबार केल्यानंतर तीन नक्षलवाद्यांना कंटस्नान घालण्यात यश आले. या नक्षलवाद्यांमध्ये पेरमिली दलांच्या दलम कमांडर बिट्टू मडावी ठार झाल्याची प्राथमिक माहितीही देण्यात आली आहे.

उद्या 1 मे महाराष्ट्र दिन असून नक्षलविरोधी गडचिरोली पोलिसांनी एक मोठी कारवाई महाराष्ट्र दिनच्या एक दिवसा अगोदर करण्यात आली आहे.

आताही या भागात नक्षलविरोधी पोलीस पथकाचे ऑपरेशन सुरू असून उद्या सकाळपर्यंत नक्षलवाद्यांचे शव पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे आणण्यात येणार आहे.