AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंत्रिपद गेलं खड्ड्यात, शिवरायांचा अवमान केल्यास सोडणार नाही; गुलाबराव पाटील यांचा घरचा आहेर

जिल्हा दूध संघाचे निवडणूक आदेश दोनच दिवसात पुन्हा बदलल्याने एकनाथ खडसेंनी ही लोकशाहीची टिंगल असून हा सरकारचा निर्लज्जपणा असल्याची टीका केली होती.

मंत्रिपद गेलं खड्ड्यात, शिवरायांचा अवमान केल्यास सोडणार नाही; गुलाबराव पाटील यांचा घरचा आहेर
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Dec 04, 2022 | 3:50 PM
Share

जळगाव: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या नंतर आता भाजपचे आमदार प्रसाद लाड वादात सापडले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाल्याचं अजब विधान लाड यांनी केलं आहे. इतिहासाचीच मोडतोड होत असल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांनी लाड यांना फैलावर घेतलेलं असतानाच राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनीही लाड यांना घरचा आहेर दिला आहे. मंत्रिपद गेलं खड्ड्यात. शिवरायांचा अवमान केल्यास सोडणार नाही, असा इशाराच गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. गुलाबराव पाटील मीडियाशी संवाद साधत होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला असल्याचं वक्तव्य केल्यामुळे प्रसाद लाड यांचाही मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार शब्दात समाचार घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलण्याचा कुण्या मायच्या लालला अधिकार नाही. शिवरायांबद्दल कोणीही वाकड तिकडं बोलत असेल तर तो कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला माफ केलं जाणार नाही. शिवरायांच्या नखाची बरोबरी हे नालायक करू शकत नाहीत. पुन्हा जर अवमान केला तर मंत्रीपद गेल खड्ड्यात यांना सोडणार नाही, असा इशाराच गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.

चार महिने झाले विरोधकांकडून सतत टीका सुरू आहे. आमच्या विकास कामांची जी गती आहे ती जनतेला आवडत आहे. आता मुख्यमंत्र्यांवर जे पैशांच्या उलाढालीचे गंभीर आरोप केले जात आहेत, त्याने जनतेचे पोट भरत नाही.

मागच्या दरवाजांनी निवडून आलेल्या संजय राऊत यांना पुढच्या दरवाजाने कसे निवडून यायचं हे माहीत नसल्याने ते अशा पद्धतीने गंभीर आरोप करत आहेत, असा टोला त्यांनी राऊत यांना लगावला.

युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी इमान विकलेल्या लोकांचे सरकार लवकरच पडेल अशी टीका केली आहे. त्यालाही पाटील यांनी जोरदार उत्तर दिले. ते वारंवार सरकार पडणार असल्याचं सांगत आहे. मीही किती दिवसांपासून तीच वाट पाहत आहे. सरकार म्हणजे काय डोंबाऱ्याचा खेळ आहे का? पोरगी वर दोरीवर चालतेय आणि खाली डोंबारी वाजवतोय. वाजू द्या. त्यांना काय वाजवायचं ते वाजू द्या, अशी टीका त्यांनी आदित्य ठाकरेंवर केली.

जिल्हा दूध संघाचे निवडणूक आदेश दोनच दिवसात पुन्हा बदलल्याने एकनाथ खडसेंनी ही लोकशाहीची टिंगल असून हा सरकारचा निर्लज्जपणा असल्याची टीका केली होती. या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला.

आदेश हे सरकारने काढले आहेत. मंत्री गुलाबराव पाटील यांनी काढलेले नाहीत. ते विरोधक असल्याने माझ्यावर टीकाच करतील. माझी आरती करतील का? असा चिमटा त्यांनी काढला.

तो विघ्नहर्ता आहे. ज्याने ज्याने आमच्यावर विघ्न टाकायचा प्रयत्न केला. त्यांचा त्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार आहे, असं साकड मी तरसोदेतील गणपतीकडे मागितल्याचंही त्यांनी सांगितलं

Follow Us
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं.
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय...
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय....
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं.
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक..
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत....
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर.
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही.
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक.
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले....
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले.....
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर...
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर....