AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पालघर जिल्ह्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, जिल्हा प्रशासनाचं नागरिकांना सतर्कतेचं आवाहन

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पालघर जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्कता बाळगावी आणि सुरक्षित राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे.

पालघर जिल्ह्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, जिल्हा प्रशासनाचं नागरिकांना सतर्कतेचं आवाहन
सांकेतिक फोटो
| Edited By: Chetan Patil | Updated on: Sep 07, 2021 | 1:08 AM
Share

पालघर : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पालघर जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्कता बाळगावी आणि सुरक्षित राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे. तसेच 6 ते 9 सप्टेंबर या कालावधीमध्ये जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने काही महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत.

जिल्हा प्रशासनाने नेमकं काय आवाहन केलं आहे?

1. दिनांक 10 सप्टेंबर पासून गणेशोत्सव सुरू असल्याने जिल्ह्यात येणाऱ्या काळात नागरिकांनी काळजी घ्यावी.

2. पुलावरुन संरक्षक दगडावरुन पाणी वाहत असल्यास प्रवास टाळावा. धाडसाने वाहन पाण्यामध्ये घालू नये.

3. अतिवृष्टीमुळे वाहतूक विस्कळीत झाल्यास, सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावेत. अनावश्यक ओव्हर टेक करुन वाहनांच्या 3-3 रांगा करु नये. प्रवासात आवश्यक खबरदारी घ्यावी.

4. वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे.

5. अतिवृष्टीमध्ये रस्त्यावर दरड कोसळण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने प्रवास करताना काळजी घ्यावी.

6. आपले घर सुरक्षित असल्यास व अतिवृष्टीमुळे घरांमध्ये पाणी भरणार नाही याची खात्री असल्यास घरातच सुरक्षित राहावे.

7. या कालावधीमध्ये आवश्यकता नसेल, तर घराच्या बाहेर पडू नये.

8. घरामध्ये पाणी घुसून पाण्याची पातळी वाढत असल्यास तात्काळ घर सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.

9. आपले घर मोडकळीस आलेल्या स्थितीमध्ये असेल किंवा कच्च्या स्वरुपाचे असेल तर तात्काळ उंचावरील ठिकाणी किंवा सुरक्षितस्थळी आवश्यक साधनसामुग्री सोबत घेऊन स्थलांतरित व्हावे.

10. घराच्या अवतीभोवती पाऊस व वादळामुळे कोणत्या वस्तु विजेचे खांब किंवा तारा, झाडे इत्यादी पडण्याची शक्यता असल्यास अशा वस्तूपासून लांब राहावे.

11. आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षित स्थळी हलवावे.

12. आपल्याजवळ दैनंदिन लागणारी औषधे, रॉकेलवर चालणारे बंदिस्त दिवे बॅटरी, गॅसबत्ती, काडीपेटी या वस्तू ठेवाव्यात.

13. मोबाईल फोन बॅटरी चार्ज करुन ठेवावेत.

14. अतिवृष्टीच्या बाबत मिळणारे इशारे समजण्यासाठी जवळ रेडिओ बाळगावा.

15. रेडिओसाठी काही जास्त वॅटच्या बॅटरीज जवळ ठेवाव्यात.

16. अतिवृष्टीचा फटका टाळण्यासाठी दरडप्रवण भागातील तसेच नदी, नाले किनारी राहणाऱ्या सखल भागातील लोकांनी सावधगिरी बाळगावी व अतिवृष्टीमुळे पाणी पातळी वाढत असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.

17. ग्राम कृती दलांनी सतर्क राहून वेळोवेळी तहसील कार्यालयास माहिती द्यावी.

18. मासेमारीसाठी व पोहायला नदी, तलाव, नाल्यात जाऊ नये. धबधब्याच्या ठिकाणी जाऊ नये.

19. विजा चमकत असताना झाडाखाली थांबू नये. मोबाईलचा वापर करू नये.

20. आपला जीव आपल्या मिळकतीपेक्षा महत्त्वाचा असल्याने प्रथम जीवितास प्राधान्य द्यावे.

21. इमारतीच्या तळमजल्यात विजेच्या मीटरपर्यंत पाणी पोहचणार नाही याची काळजी घ्यावी आणि तात्काळ महावितरणच्या अधिकाऱ्यास कळवावे.

22. मदत आवश्यक असल्यास आपल्या ग्रामपंचायत, तलाठी, ग्रामसेवक, तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच जिल्हा पोलीस नियंत्रण व जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्षाशी तसेच तहसील कार्यालय यांचेशी संपर्क साधावा.

संबंधित बातमी : मुंबईसह राज्यभर पावसाचा जोर वाढणार; विजांच्या कडकडाटासह हजेरी लागणार

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?