चंद्रपुरात 20 दिवसांना बरसला मुसळधार पाऊस

| Updated on: Jun 30, 2021 | 3:51 PM

Rain in Chadrapur | चंद्रपूर जिल्ह्यात 7 जूनपासून वार्षिक सरासरीच्या केवळ 20 टक्के पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे सामान्य नागरिक आणि शेतकरी प्रचंड चिंतेत होते.

चंद्रपुरात 20 दिवसांना बरसला मुसळधार पाऊस
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

चंद्रपूर: तब्बल तीन आठवडे दडी मारल्यानंतर बुधवारी चंद्रपुरात मुसळधार पाऊस पडला. गेल्या काही तासांपासून चंद्रपुरात पावसाच्या (Rain) जोरदार सरी बरसत आहेत. त्यामुळे वातावरणाला उकडा कमी झाला आहे. परिणामी नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Heavy Rain in Chandrapur)

चंद्रपूर जिल्ह्यात 7 जूनपासून वार्षिक सरासरीच्या केवळ 20 टक्के पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे सामान्य नागरिक आणि शेतकरी प्रचंड चिंतेत होते. मात्र, आज मुसळधार पावसाने सगळ्यांनाच दिलासा दिला. अजूनही आकाशात काळ्या ढगांची गर्दी असल्याने पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अकोल्यात पूल वाहून गेल्याने 8 ते 10 गावांचा संपर्क तुटला

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाथर्डी येथील पूल वाहून गेलाय. त्यामुळे 8 ते 10 गावांचा संपर्क तुटला असून शेतीचेही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

अकोट राज्य मार्गाचे गेल्या 2 वर्षापासून काम सुरु आहे. त्यामुळे सर्वीच कडे रस्ते खोदून ठेवले आहेत. तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पाथर्डी येथील पूल वाहून गेल्याने जास्तगाव, राणेगावं,भोकर,वरुड, सिरसोली,पाथर्डी आणि टाकळी या गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा मार्ग बनवून देण्यात यावा अशी मागणी गावकरी करीत आहे.

येत्या 5 दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज

गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात दडी मारून बसलेला पाऊस लवकरच पुनरागमन करणार आहे. येत्या पाच दिवसांमध्ये महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस (Rain) पडू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

नैऋत्येडून येणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे पाऊस पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ईशान्येकडील राज्यांकडे सरकरण्याची शक्यता आहे. त्यामुळे 1 जुलैपर्यंत संबंधित राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो. यामध्ये महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकचा समावेश आहे. याशिवाय, पंजाब, राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीतही जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पावसासोबत बर्फवृष्टीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

संबंधित बातम्या:

Weather Alert: राज्यात पावसाची दडी, आणखी 7 दिवस मान्सूनचे वारे कमकुवत; हवामान खात्याचा अंदाज

गुरे चारण्यासाठी गेलेल्या चौघांच्या अंगावर वीज कोसळली, एकाचा जागीच मृत्यू

Akola | अकोल्यात पूल वाहून गेल्याने 8 ते 10 गावांचा संपर्क तुटला, शेतीचंही नुकसान

(Heavy Rain in Chandrapur)