BHR Scam: ‘माझ्या इतक्या चौकश्या झाल्या, तो राजकीय विषय नव्हता तर हा कसा असेल?’

Eknath Khadse BHR scam | बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहारात हजारो ठेवीदारांचा पैसा असुरक्षित झाला. त्यामुळे हजारो संसार उदध्वस्त झाले. आता या गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीला वेग आला आहे. त्यामुळे हा काही राजकीय विषय नाही.

BHR Scam: 'माझ्या इतक्या  चौकश्या झाल्या, तो राजकीय विषय नव्हता तर हा कसा असेल?'
एकनाथ खडसे, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: Jun 18, 2021 | 12:43 PM

जळगाव: बीएचआर पतसंस्था गैरव्यवहारप्रकरणात सरकारकडून होत असलेली कारवाई योग्य असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी व्यक्त केले आहे. याप्रकरणी विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या आरोपांनाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. माझ्या इतक्या चौकश्या झाल्या, तो राजकीय विषय नव्हता तर हा कसा असेल, असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला. (NCP leader Eknath Khadse on BHR Scam in Jalgaon)

ते शुक्रवारी जळगावात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. जळगाव बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणात होत असलेली कारवाई ही राजकीय हेतूने केली जात आहे, असे नाही. या प्रकरणात कोणाची नावे आहेत, याची मला माहिती नाही. परंतु, या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या सर्वांची चौकशी व्हायलाच हवी, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली.

बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहारात हजारो ठेवीदारांचा पैसा असुरक्षित झाला. त्यामुळे हजारो संसार उदध्वस्त झाले. आता या गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीला वेग आला आहे. त्यामुळे हा काही राजकीय विषय नाही. तो ठेवीदारांच्या संरक्षणाचा विषय आहे. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांना शासन होईलच, मग तो लहान असो किंवा मोठा असो. माझी यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, आयकर विभाग, लोकायुक्त, दहशतवाद विरोधी पथकाकडून चौकशी झाली आहे. आता सध्या सक्तवसुली संचालनालयाकडून देखील चौकशी सुरू आहे. मी कोणताही गुन्हा केलेला नसताना माझ्या एवढ्या चौकश्या होऊ शकतात. तो राजकीय विषय नव्हता तर आता बीएचआर प्रकरणी सुरू असलेल्या कारवाईचा विषय राजकीय कसा असू शकतो, अशा तिरकस शब्दांत खडसे यांनी विरोधकांना टोला लगावला.

बीएचआर पतसंस्था गैव्यवहारप्रकरणी 12 जणांना अटक

आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणात राज्यभरात छापे टाकले. यावेळी 12 जणांना अटक करण्यात आली. अटक केलेल्या संशयितांमध्ये उद्योजक, व्यापाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी काहीजण भाजप नेते गिरीश महाजन यांच्या निकटवर्तीयांपैकी असल्याचे समजते.

यापूर्वीही नोव्हेंबर 2020 मध्ये या प्रकरणात कारवाई झाली होती. तेव्हा 6 जणांना अटक करण्यात आले होते. या प्रकरणाची चौकशी सुरू असताना आता पुन्हा काही संशयितांची नावे समोर आली आहेत. त्यानंतर हे अटकसत्र राबविण्यात आले.

भागवत भंगाळे (जळगाव), छगन झाल्टे (जामनेर), जितेंद्र रमेश पाटील (औरंगाबाद येथून अटक), आसिफ मुन्ना तेली (भुसावळ), जयश्री शैलेश मणियार (जळगाव), संजय तोतला (जळगाव), राजेश लोढा (जामनेर), प्रितेश चंपालाल जैन (धुळे), अंबादास आबाजी मानकापे (औरंगाबाद), जयश्री अंतिम तोतला (मुंबई), प्रेम नारायण कोगटा (यांना पुण्यातील हॉटेलातून अटक) आणि प्रमोद किसनराव कापसे (अकोला) अशा एकूण 12 जणांना अटक करण्यात आली आहे.

गिरीश महाजन काय म्हणाले?

सगळेच माझे निकटवर्तीय आहेत. आमदार चंदू पटेल यांचे नावही त्यात आहे. या सर्वांनी कर्ज फेड केली असल्याचा दावा केला होता आहे. या प्रकरणी कायद्याप्रमाणे कारवाई होईल, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली.

संबंधित बातम्या:

25 कोटींची मालमत्ता अवघ्या दीड कोटीत घेतली? महाजनांवरील नव्या आरोपानं खळबळ

बीएचआर बँक घोटाळ्याची व्याप्ती अकराशे कोटींची, बड्या मंडळींनी मालमत्ता विकत घेतल्या, एकनाथ खडसेंचा आरोप

खडसेंच्या नव्या प्लॅनमुळे गिरीश महाजनांच्या अडचणी वाढणार, ‘या’ प्रकरणात कारवाईची शक्यता

(NCP leader Eknath Khadse on BHR Scam in Jalgaon)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.