राज्याच्या राजकारणात आता आणखी एका पक्षाची भर; समान न्यायावर आधारित हा पक्ष करणार काम

या पक्षाचा लोकार्पण सोहळा नांदेड जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र माहूरमध्ये पार पडलाय. या सोहळ्याला झालेली गर्दी पाहून अनेकांच्या उरात धडकी भरली नाही तरच नवल...!

राज्याच्या राजकारणात आता आणखी एका पक्षाची भर; समान न्यायावर आधारित हा पक्ष करणार काम
Follow us
| Updated on: Apr 10, 2023 | 10:05 AM

नांदेड : नांदेडमध्ये यापूर्वी हैदराबादच्या असद ओवेसी यांच्या एमआयएमने नांदेडमार्गे राज्यात प्रवेश केला होता. एमआयएमला त्यानंतर राज्यात बऱ्यापैकी यश मिळाले. त्या पाठोपाठ तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी देखील आपल्या पक्षाचा देशात विस्तार करण्यासाठी नांदेडचीच निवड केली. तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षाचे भारत राष्ट्र समिती असे नामकरण करत केसीआर यांनी लागोपाठ नांदेडमध्ये दोन सभा घेतल्या. त्यांच्या सभेला चांगलीच गर्दी झाली होती. आता भटक्या विमुक्त आणि उपेक्षित समाजासाठी कार्यरत असणाऱ्या चोवीस संघटनांना एकत्र आणत संपत चव्हाण यांनी समनक पार्टीची स्थापना केलीय. समनक जनता पार्टी या पक्षाचा लोकार्पण सोहळा नांदेड जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र माहूरमध्ये पार पडलाय. या सोहळ्याला झालेली गर्दी पाहून अनेकांच्या उरात धडकी भरली नाही तरच नवल…!

NANDED 2 N

हे सुद्धा वाचा

चोवीस संघटनांचा पाठिंबा

नांदेड जिल्ह्यातील माहूर इथे समनक जनता पार्टी या नूतन पक्षाचा लोकार्पण सोहळा पार पडलाय. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विविध चोवीस संघटनांनी या पक्षाला पाठिंबा दिलाय. विशेषतः भटक्या विमुक्त समाजासाठी काम करणाऱ्या संघटनानी एकत्र येत या पक्षाची स्थापना केलीय.

या पक्षाच्या लोकार्पण सोहळ्यात राज्यासह शेजारच्या तेलंगणा आणि कर्नाटक राज्यातील विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला. पक्षाच्या या लोकार्पण सोहळ्याला मोठी गर्दी झाली होती. दरम्यान सर्वांना समान न्याय या धोरणा प्रमाणे समनक जनता पार्टी काम करणार असल्याचे पक्षाचे संयोजक संपत चव्हाण यांनी सांगितलं.

समनक म्हणजे नेमकं काय ?

समनक जनता पार्टी या नावाने स्थापना झालेला हा पक्ष आपल्या अनोख्या नावाने चर्चेत आलाय. समनक न्याय पद्धती ही प्राचीन पद्धती आहे. समनक म्हणजे सर्वांना समान न्याय देणे या अर्थाने हा शब्द रूढ आहे. देशात आजवर उपेक्षित-दुर्लक्षित असलेल्या समाज घटकाला एकत्र आणून समनक जनता पार्टी काम करणार आहे.

समाजातील खालच्या पातळीवर असणाऱ्या घटकांना न्याय देणे हा आपल्या पक्षाचा अजेंडा असल्याचे पक्षाने या सभेत जाहीर केलंय. या पक्षाच्या लोकार्पण सोहळ्याला किनवट माहूर तालुक्यातील बंजारा बांधवांची मोठ्या संख्येने हजेरी होती. विशेष म्हणजे असंख्य बंजारा महिला आपल्या पारंपरिक वस्त्र आणि वेशभूषेत सोहळ्यात उपस्थित झाल्या होत्या.

लोकार्पण सोहळ्याला अनेकांचा पाठिंबा

समनक जनता पार्टीच्या लोकार्पण सोहळ्याला अनेकांनी हजेरी लावत पक्षाला पाठिंबा दिलाय. राज्यात सक्रियपणे कार्यरत असलेल्या एकूण 24 संघटनांनी या पक्षाला जाहीर पाठिंबा दिलाय. त्यामुळे लोकार्पण सोहळ्यातच समनक जनता विकास पार्टीला मोठे पाठबळ मिळालंय.

आगामी काळात याच वंचित आणि दुर्लक्षित राहिलेल्या घटकांतील कार्यकर्त्यांना उमेदवारी देत निवडणुकीला उभे करणार असल्याची भूमिका या पक्षाने जाहीर केलीय. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आता आणखीन एका पक्षाची भर पडली आहे.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.