गौतमी पाटील हिला 3 गाण्यासाठी काही लाख मोजतात, आम्ही पाच… इंदुरीकर महाराज असं काय म्हणाले गौतमीबद्दल?

| Updated on: Mar 26, 2023 | 8:35 AM

निवृत्ती महाराज देशमुख ऊर्फ इंदुरीकर महाराज यांनी प्रसिद्ध लावणी नृत्यांगना गौतमी पाटील हिच्यावर टीका केली आहे. आम्ही पाच हजार मागितले तर याने बाजार मांडला म्हणतात. पण गौतमीला तीन गाण्यासाठी तीन लाख देतात, असा चिमटा त्यांनी काढला.

गौतमी पाटील हिला 3 गाण्यासाठी काही लाख मोजतात, आम्ही पाच... इंदुरीकर महाराज असं काय म्हणाले गौतमीबद्दल?
indurikar maharaj
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बीड : सबसे कातील गौतमी पाटीलची क्रेझ काही कमी होताना दिसत नाहीये. गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होते. तिचा प्रत्येक कार्यक्रम हाऊसफुल्ल होतो. लावणी नृत्यांगनांमध्ये गौतमी पाटील सर्वाधिक मानधन घेते. एका कार्यक्रमासाठी ती तब्बल तीन लाखाच्या पुढे रक्कम घेते. लोकही एवढी रक्कम देऊन तिचा कार्यक्रम आयोजित करतात. यावरून गौतमीची क्रेझ किती आहे हे लक्षात येतं. मात्र, याचबरोबर गौतमीवर टीकाही होत असते. तिच्या नृत्यावर आक्षेप घेतला जातो. तिचं नृत्य अश्लील असल्याचं म्हटलं जातं. याबद्दल गौतमीने माफीही मागितली होती आणि आपल्या नृत्यात सुधारणाही केली होती. आता साक्षात निवृत्ती महाराज देशमुख ऊर्फ इंदुरीकर महाराज यांनीही गौतमीवर टीका केली आहे.

आष्टी तालुक्यातील तवलवाडी येथील महोत्सवात काल इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन ठेवण्यात आले होते. यावेळी इंदुरीकर महाराजांनी नाव न घेता गौतमी पाटीलवर टीका केली. आम्ही पाच हजार मागितले तर पैशाचा बाजार मांडला असा आरोप होतोय. त्याचं काय खरं आहे, असं म्हटलं जातं. मात्र गौतमी हिने तीन गाणे वाजविले की तीन लाख रुपये मोजतात. तिच्या कार्यक्रमात मारामारी, तर काहींचे गुडघे फुटतात. आम्हाला मात्र टाळ वाजवून काहीही मिळत नाही. साधं संरक्षण देखील दिले जात नाही. असं इंदुरीकर महाराज म्हणाले.

हे सुद्धा वाचा

मी गेल्यावर कळेल

कीर्तनकारांनी 5 हजार रुपये मागितले तर काय खरं आहे त्यांचं, असं म्हणतात. पण तिकडे तीन लाखाला तीनच गाणी ऐकतात आणि 300 पोरांच्या चडड्या फाटतात. 200 पोरांचे गुडघे फुटतात. मारामाऱ्या झाल्या. शेतकरी तुम्ही बोलयाचे नाही. आम्ही रस्त्यावर कीर्तन करतो. आमचं जीवन वाऱ्यावर. आम्हाला काय संरक्षण आहे? आम्हाला विमा नाही. जे जे लोक खरं काम करतात त्यांचा भोंग्या करायचा. तुम्ही बधिर आहे, म्हणून चाललंय सगळं. मी गेल्यावर कळेल तुम्हाला हा काय बोलत होता, असं इंदुरीकर महाराज म्हणाले.

काळ खूप वाईट आलाय

काळ किती वाईट आलाय. लग्नाला जायचं नाही. मौतीला जायचं नाही. कार्याला गेला नाही. आपण एखाद्या दहाव्याला गेलो पण दिसला नाही, असं लोक म्हणतात. तेव्हा दुसरा म्हणतो तो दुसऱ्या पार्टीत आहे. इतका काळ वाईट आला आहे, असं सांगतानाच प्रत्येकाने धर्मनिष्ठ राहा. कुणाच्याही धर्माचा अवमान करू नका. शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि तुकाराम महाराज किंवा आपल्या प्रिय व्यक्तीबद्दल कुणी मोबाईल क्लिप टाकली तर लगेच व्हायरल करू नका. चुकीची असेल तर डिलीट करा. तुकाराम महाराज आपले बाप आहे. शिवाजी महाराज आपले प्राण आहेत. त्यामुळे कुणाच्याही अपप्रचाराला बळी पडू नका, असं आवाहन त्यांनी केलं.