राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे भाजपवर टीकास्त्र; अशी केली जहरी टीका

| Updated on: Mar 26, 2023 | 2:24 PM

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार संवेदनहिन आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे बघण्यास त्यांना वेळ नाही. अवकाळी पावसामुळे राज्यात प्रचंड नुकसान झाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे भाजपवर टीकास्त्र; अशी केली जहरी टीका
Follow us on

नंदुरबार : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पक्षांतर्गत पक्ष संघटना बांधणीसाठी उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा ते आढावा घेणार आहेत. नंदुरबार येथे आले असताना राहुल गांधींचे निलंबन ते अधिवेशनात शेतकऱ्यांना मदतीची न झालेली घोषणा अधिवेशनावर त्यांनी सत्ताधाऱ्यांना चांगले टोले लगावले. आठ ते दहा लाख लोकांनी आपल्या लोकसभा मतदारसंघातून खासदार निवडून दिलेला असतो. मात्र तो खासदार सत्ताधारी पक्षाला नाकीनऊ आणत असेल आणि त्याची टीका जिव्हारी लागत आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई केली जात असल्याची टीका त्यांनी केली.

आश्वासना पलीकडे काही नाही

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार संवेदनहिन आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे बघण्यास त्यांना वेळ नाही. अवकाळी पावसामुळे राज्यात प्रचंड नुकसान झाले. मात्र सरकारमधील मंत्री अधिवेशनाचे नाव करून अधिवेशनात मदत जाहीर केली जाईल, अशा घोषणा राज्यभर करत फिरले. अधिवेशन संपले मात्र सरकारने शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली नाही. पूर्ण अधिवेशन उद्धव ठाकरे आणि विरोधकांवर टीका करण्यातच खर्ची घातल्याचं चित्र आहे. सरकार फक्त आणि फक्त आश्वासनाचा पलीकडे काही करत नसल्याची टीका पाटील यांनी केली.

हे सुद्धा वाचा

लोकांना ओढून आणावं लागत नाही

शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे मालेगाव मध्ये सहभाग घेत आहेत. या मतदारसंघात त्यांना लोकांचा मोठा पाठिंबा आहे. या सभेच्या माध्यमातून हा लोकांचा पाठिंबा नक्की व्यक्त होईल. लोकांना ओढून आणावं लागत नाही ते स्वतःहून येतात हे त्यांच्या सभेचे वैशिष्ट्ये असल्याचे त्यांनी सांगितलं.

माल लगाओ आणि माल कमाओ

राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिल गोटे यांनी अवकाळीमध्ये शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीवरुन सरकारसह राज्यकर्त्यांवर विखारी टीका केली आहे. राज्यकर्ते हे निच, नालायक, हलकट आणि स्वार्थी असून नुसती बोलतात. त्यांना अजिबात शेतकऱ्यांची जाण नाही. माल लगाओ आणि माल कमाओ हा फक्त त्यांचा धंदा असल्याचे सांगत हे हलटक राज्यकर्ते पुन्हा सत्तेत येतील असं वाटत नाही, असं टीकास्त्र गोटे यांनी सोडलं. धुळे, नंदुरबार जिल्ह्यात अवकाळीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. असे असताना शासनाकडून कवडीची मदत झाली नाही. ते सरकारवर चांगलेच बरसल्याचे पहावयास मिळाले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. यावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल गोटे यांनी प्रतिक्रिया दिली. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली. या यात्रेत राहुल गांधी यांना उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला. राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचे महत्त्व वाढले. त्यांना मोदी पप्पू म्हणतात. मात्र स्वतः मोदी पप्पू आहेत, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठकीच्यावेळी अनिल गोटे यांनी भाजपवर टीका केली.