आमदार कैलास पाटील यांचं उपोषण सातव्या दिवशी मागे, शासन, प्रशासनानं घेतली दखल

आमदार कैलास पाटील म्हणाले, ऐन दिवाळीत तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात.

आमदार कैलास पाटील यांचं उपोषण सातव्या दिवशी मागे, शासन, प्रशासनानं घेतली दखल
आमदार कैलास पाटील यांचं उपोषण सातव्या दिवशी मागे
Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Oct 30, 2022 | 2:36 PM

उस्मानाबाद : आमदार कैलास पाटील यांनी सात दिवसांचं उपोषण स्थगित केलंय. शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा तसेच अतिवृष्टीनं झालेली नुकसान भरपाई मिळावी, यासाठी हे आंदोलन सुरू होतं. राज्यसरकारनं अनेक मागण्या मान्य केल्या आहेत. खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले, टीव्ही 9 मराठीनं हा मुद्दा राज्य सरकारपर्यंत पोहचविला. त्याबद्दल हा लढा खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम टीव्ही 9 मराठीनं केलंय. धाराशीवकरांना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं फार मोठी मदत केल्याचं ते म्हणाले.

हा लढा शेतकऱ्यांचा होता. जलसमाधी, जमिनी गाडून घेणं, चिखलात बुडवून घेणं अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करण्यात आलंय. गावोगावच्या शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला. काल व्यापाऱ्यांनीही एक दिवस बंद केलं. प्रशासनानं लढा भरकटू न देता प्रशासनानं मदत केली, असंही खासदार निंबाळकर म्हणाले.

आमदार कैलास पाटील म्हणाले, ऐन दिवाळीत तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. शेतकऱ्यांना मदत मिळाली नव्हती. शेतकऱ्यांची ही दिवाळी अंधारात गेली. त्यामुळं याला वाचा फोडणं गरजेचं होतं.

त्यामुळं उपोषणाचं शस्त्र वापरावं लागलं. शासनानं व प्रशासनानं याची दखल घेतली. विमा कंपनीवर कारवाई करण्यात आली. कंपनीला सील लावण्यात आलंय. कंपनीकडून पैसे वसूल करून देण्यात येत आहेत. प्रलंबित अनुदानाचे पैसे देण्यात येणार आहेत.

विधान परिषदेचे विरोध पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, कैलास पाटील शिवसैनिकचं नव्हे तर मित्र आहेत. शेतकऱ्याचं आंदोलन हे भावनिक होतं. उपोषण सुटण्यासाठी मागण्या मान्य केल्या गेल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रशासनानं प्रश्न सोडविण्यासाठी मदत केली. उद्धव ठाकरे यांचा दूत म्हणून काम केलं. हा लढा राज्यातील शेतकऱ्यांचा बनला आहे. पीकविमा कंपन्यांची दादागिरी यामुळं कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केलं. यावेळी फटाके फोडून खऱ्या अर्थानं दिवाळी साजरी करण्यात आली.