सुप्रिया सुळेंच्या स्वागतासाठी उभ्या गर्दीत मालवाहू वाहन घुसले, तिघे गंभीर जखमी

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे शेगांवकडे जात असताना शनिवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील नांद्री फाट्यावर सुप्रिया सुळे यांच्या स्वागतासाठी उभे असलेल्या लोकांच्या गर्दीत मालवाहू वाहन घुसले.

सुप्रिया सुळेंच्या स्वागतासाठी उभ्या गर्दीत मालवाहू वाहन घुसले, तिघे गंभीर जखमी
सुप्रिया सुळे यांच्या बुलडाणा दौऱ्यातील फोटो
Follow us
| Updated on: Sep 26, 2021 | 9:17 AM

बुलडाणा : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या स्वागतासाठी उभे असलेल्या लोकांच्या गर्दीत मालवाहू वाहन घुसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बुलडाण्यात घडलेल्या या भीषण घटनेत तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताच्या वेळी सुप्रिया सुळे घटनास्थळी नव्हत्या, त्या सुखरुप आहेत.

नेमकं काय घडलं?

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे शेगांवकडे जात असताना शनिवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील नांद्री फाट्यावर सुप्रिया सुळे यांच्या स्वागतासाठी उभे असलेल्या लोकांच्या गर्दीत मालवाहू वाहन घुसले. या घटनेत तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. भाजप पदाधिकारी शांताराम बोधे आणि अशोक हटकर हे जखमी झाले असून त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरु असल्याची माहिती आहे.

सुप्रिया सुळेंचा बुलडाणा दौरा

दरम्यान, विरोधकांनी आमच्यावर टीका करत राहावी, आम्ही जनतेची सेवा करत राहणार, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी काल बुलडाण्यात विरोधकांवर टीका केली होती. महाविकास आघाडी सरकारचे विरोधक अर्थात भाजपने महिला अत्याचार संदर्भात आघाडी सरकार अपयशी ठरलं असा आरोप केला आहे. त्या आरोपाला उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, आमचे सरकार दडपशाहीचे नाही. टीका करणे हे विरोधकांचे काम आहे आणि त्यांनी करावे, मात्र आम्ही जनतेची सेवा करणार, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

“सोमय्यांचे कोणत्याही जिल्ह्यात स्वागतच”

भाजप खासदार किरीट सोमय्या यांचे कोणत्याही जिल्ह्यात गेले, तरी स्वागतच आहे. पुण्याच्या जिल्हा बँकेतही त्यांचे स्वागत केले होते. त्यामुळे आम्हाला काही लपवायचे नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

कमला हॅरीस यांचे मनापासून स्वागत आहे, कारण त्यांनी म्हटलंय की प्रत्येक देशामध्ये लोकशाही वाचली पाहिजे आणि जगली पाहिजेत, अशी प्रतिक्रियाही सुप्रिया सुळे यांनी दिली.

“जिजाऊंच्या स्मारकासाठी मिळून प्रयत्न करणार”

दरम्यान, सिंदखेड राजा येथील जिजाऊंचे स्मारक हे राज्याचे नव्हे तर संपूर्ण देशाचे वैभव आहे. त्याचे जतन होणे गरजेचे आहे. यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी एकत्र येऊन या वास्तूंचे जतन करण्यासाठी योग्य ती पावले उचलायला पाहिजेत, तेथे सर्व सुविधा पुरवायला पाहिजेत, यासाठी आम्ही सर्व जण मिळून प्रयत्न करणार आहोत, असंही सुळेंनी सांगितलं.

कार अपघातात नागपुरातील दोन तरुणींचा मृत्यू

दुसरीकडे, कारवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात नागपुरातील दोन तरुणींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अपघात इतका भीषण होता की कार एका घराच्या कम्पाऊंड वॉलमध्ये घुसली. अपघाताच्या वेळी कारमध्ये चौघे जण होते, त्यापैकी दोन मैत्रिणींना प्राण गमवावे लागले, तर दोन मित्र जखमी झाले आहेत.

नागपूरच्या सतरंजीपुरा आणि इतवारी परिसरात राहणाऱ्या दोन तरुणींचा कार अपघातात मृत्यू झाला. अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत. नागपूरमधील अमरावती मार्गावरील भरतनगर परिसरात हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की नियंत्रण सुटल्यानंतर कार एका घराच्या कम्पाऊंड वॉलमध्ये घुसली.

संबंधित बातम्या :

भरधाव कार कम्पाऊंड वॉलला आदळून उलटली, दोघी मैत्रिणींचा मृत्यू, दोन मित्र गंभीर

CCTV VIDEO | अस्थी विसर्जनानंतर परतणाऱ्या कुटुंबाला अपघात, टेम्पोला अर्टिगाची जोरदार धडक

आबांच्या पत्नीमुळे अपघातग्रस्तांचे प्राण वाचले, आमदार सुमनताई पाटलांची मदतीसाठी तत्परता

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.