AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजेश टोपे कोल्हापुरात, अधिकाऱ्यांच्या आधीच कार्यालयात, नवे जिल्हाधिकारी धावतच बैठकीला हजर

जिल्हाधिकारी यांच्या आधी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाल्याने अधिकारी धावाधाव करत जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले.

राजेश टोपे कोल्हापुरात, अधिकाऱ्यांच्या आधीच कार्यालयात, नवे जिल्हाधिकारी धावतच बैठकीला हजर
राजेश टोपे, आरोग्यमंत्री
| Edited By: | Updated on: Jul 16, 2021 | 10:36 AM
Share

कोल्हापूर : राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Maharashtra Health Minister Rajesh Tope) कोल्हापूर (Kolhapur) दौऱ्यावर आहेत. आज ते जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत आहेत. ही बैठक सकाळीच सुरू झाली. आरोग्यमंत्री राजेश टोपे नेमक्या कोणकोणत्या सूचना अधिकाऱ्यांना देतात हे पाहावे लागेल. दरम्यान ही बैठक नियोजित नसल्याने अधिकाऱ्यांच्या आधीच आरोग्य मंत्री राजेश टोपे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले. त्यामुळे नव्याने पदभार स्वीकारलेले जिल्हाधिकारी राहुल रेखावार (Rahul Rekhawar), कोल्हापूर महानगरपालिका (Kolhapur Municipal corporation) आयुक्त कादंबरी बलकावडे आणि जिल्हा परिषद सीईओ संजय चव्हाण हे धावतच जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले. (Maharashtra Health Minister Rajesh Tope visits Kolhapur review corona covid 19 situation with new collectorRahul Rekhawar)

जिल्हाधिकारी यांच्या आधी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाल्याने अधिकारी धावाधाव करत जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त कादंबरी बलकावडे आणि जिल्हा परिषद सीईओ संजय चव्हाण धावतच जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक नसताना अचानक मंत्री आल्याने अधिकाऱ्यांची धावाधाव झाली.

भाजप शिष्टमंडळ भेटीला

आरोग्य मंत्री राजेश टोपे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री टोपे यांची भेट घेऊन निवेदन दिलं. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आपण आढावा बैठक घेऊन 20 दिवस झाले तरी रुग्णवाढ थांबलेली नाही. हे प्रशासनाचे अपयश आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात पालकमंत्री आणि मालकमंत्री अशी अवस्था असून एकाने बैठक घेतली की दुसरा बैठक घेतो अशी टीका पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव न घेता शिष्टमंडळाने टोपे यांच्यासमोर केली. जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक ती सर्व उपायोजना कराव्यात अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा यावेळी देण्यात आलाय.

दुकाने कधी उघडणार?

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व दुकाने उघडायला सोमवारपासून परवानगी देण्याचे संकेत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले. कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या राजेश टोपे यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांना व्यापार सुरू करायला परवानगी देण्याबाबत निवेदन सादर केलं. यावेळी व्यापाऱ्यांशी बोलताना टोपे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी येत असून जिल्हा लेव्हल 3 वर आला आहे अशी माहिती दिली. त्यामुळे सोमवारपासून जिल्ह्यातील सर्व व्यवसाय सुरू करायला परवानगी मिळू शकते. याबाबतच्या आदेश दोन दिवसात काढले जातील अशी देखील ग्वाही यावेळी टोपे यांनी शिष्टमंडळाला दिली.

या निर्णयामुळे व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान जबाबदार मंत्र्यांनी आश्वस्त केल्यामुळे व्यवसाय सुरू होतील अशी म्हाला खात्री आहे मात्र तसं झालं नाही तरी सोमवारपासून व्यवसाय सुरू करणार असल्याचे देखील व्यापाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

केंद्रीय पथक कोल्हापुरात 

जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती अजूनही नियंत्रणात येत नसल्याने याची दखल आता थेट केंद्राने घेतली आहे. केंद्राचं एक पथक काल कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतं.  या पथकाने जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढाव घेतला.

चार सदस्यीय हे पथक दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाशी सोबत घेऊन केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. त्याचबरोबर काही खाजगी हॉस्पिटल, त्याचबरोबर लसीकरण केंद्रांना देखील भेटी देणार आहे.

देशात आणि राज्यात बहुतांश ठिकाणी कोरूना परिस्थिती नियंत्रणात येत असताना कोल्हापूर जिल्ह्यात मात्र परिस्थिती अजूनही गंभीर आहे. दिवसाला अजूनही एक हजार ते पंधराशे नवे रुग्ण आढळत असून पॉझिटिव्हिटी रेट 17 टक्क्यांहून अधिक आहे. एका बाजूला राज्यात तिसरा लाटेची शक्यता वर्तवली जात असतानाच कोल्हापूर जिल्हा मात्र अजूनही दुसऱ्या लाटेतून मुक्त झालेला नाही.

संबंधित बातम्या 

कोल्हापूरची कोरोना परिस्थिती नियंत्रणात येईना, थेट केंद्राचं पथक दाखल, आरोग्य यंत्रणेची झाडाझडती घेणार!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.