‘पोलीस, आर्मी आली तरी आता पर्वा नाही, शुक्रवारपासून दुकाने उघडणार!’ कोल्हापुरातील व्यापारी आक्रमक

व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीची गरज नाही. मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी संध्याकाळपर्यंत निर्णय घ्यावा. अन्यथा शुक्रवारपासून कुठल्याही परिस्थितीत दुकानं उघडणार. मग पोलीस किंवा आर्मी आली तरी पर्वा नाही, अशी आक्रमक भूमिका महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे ललित गांधी यांनी मांडली आहे.

'पोलीस, आर्मी आली तरी आता पर्वा नाही, शुक्रवारपासून दुकाने उघडणार!' कोल्हापुरातील व्यापारी आक्रमक
कोल्हापूर लॉकडाऊन
Follow us
| Updated on: Jul 14, 2021 | 9:10 PM

कोल्हापूर : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्यापारी वर्गाला दिलासा देण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, महाविकास आघाडी सरकारकडून व्यापाऱ्यांना कुठलाही दिलासा देण्यात आला नाही. त्यामुळे कोल्हापुरातील व्यापाऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे. व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीची गरज नाही. मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी संध्याकाळपर्यंत निर्णय घ्यावा. अन्यथा शुक्रवारपासून कुठल्याही परिस्थितीत दुकानं उघडणार. मग पोलीस किंवा आर्मी आली तरी पर्वा नाही, अशी आक्रमक भूमिका महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे ललित गांधी यांनी मांडली आहे. (No decision on traders in state cabinet meeting, traders in Kolhapur aggressive)

बुधवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्यापाऱ्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, सरकारने कुठलाही निर्णय घेतला नसल्यानं व्यापाऱ्यांची निराशा झाली आहे. सरकारची संवेदनशीलता हरवली आहे का? असा सवाल व्यापाऱ्यांनी विचारला आहे. दरम्यान, दोन डोस घेतलेल्या व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यास परवानगी देण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय. सरकारच्या या भूमिकेवरुनही व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केलीय.

पुरेसे डोस उपलब्ध नसताना लसीकरण कसे करणार?

कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या व्यापाऱ्यांनाच दुकान उघडायला परवानगी सरकार देणार असेल तर ही सरकारची दुटप्पी भूमिका आहे. अशा निर्णयाला कोणताही अर्थ नाही. सगळी कारणं सांगून झाल्यानंतर सरकारचं दुकान बंद ठेवण्यासाठी हे आणखी एक कारण आहे. पुरेसे डोस उपलब्ध नसताना लसीकरण कसे करणार? असा सवाल व्यापाऱ्यांनी विचारला आहे. निर्णय घेण्याआधी व्यापार्‍यांना प्राधान्याने लस उपलब्ध करून द्या, अशी मागणीही त्यांनी केलीय.

मंत्रिमंडळ बैठकीत लोकल, व्यापाऱ्यांबाबत निर्णय नाही

मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वसामान्य नागरिकांसाठी नियमावलीसह लोकल सुरु करण्याबाबत निर्णय होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात होता. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांसाठी लोकल प्रवासाचा विचार व्हावा, अशी मागणी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केली होती. मात्र, त्याबाबत आजच्या बैठकीत कुठलाही निर्णय झाला नसल्याचं आता स्पष्ट झालंय.

दुसरीकडे राज्यभरात व्यापारी वर्ग कोरोना निर्बंधांविरोधात आक्रमक झालेल्या पाहायला मिळत आहे. अनेक शहरात व्यापाऱ्यांनी सरकारविरोधात निदर्शनं केली. त्यामुळे व्यापारी वर्गाचा संताप पाहता व्यापाऱ्यांबाबत काही सकारात्मक निर्णय होऊ शकतो, अशीही एक शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, त्याबाबतही या बैठकीत निर्णय झालेला नाही.

संबंधित बातम्या :

दोन डोस घेतलेल्यांनाच महाराष्ट्रात प्रवेश देणार; राजेश टोपेंचं मोठं विधान

साहसी पर्यटन धोरणास मान्यता ते वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात वाढ, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीतील तीन मोठे निर्णय

No decision on traders in state cabinet meeting, traders in Kolhapur aggressive

Non Stop LIVE Update
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.