मोहिते पाटील गटाच्या सदस्यांना न्यायालयाचा दिलासा, विनंतीवरुन अपात्रता सुनावणीस स्थगिती

सोलापूर जिल्हा परिषदेतील मोहिते-पाटील गटाच्या 6 सदस्यांना अपात्र करण्यासाठी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुरु असलेल्या सुनवणीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. 'न्यायशास्त्रात विशेष प्रावीण्य' मिळवलेल्या व्यक्तीकडून न्यायदान व्हावे, अशी मागणी मोहिते- पाटील गटाच्या जिल्हा परिषद सदस्यांनी उच्च न्यायालयात केली होती.

मोहिते पाटील गटाच्या सदस्यांना न्यायालयाचा दिलासा, विनंतीवरुन अपात्रता सुनावणीस स्थगिती
सोलापूर जिल्हा परिषदेतील मोहिते-पाटील गटाच्या 6 सदस्यांना अपात्र करण्यासाठी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुरु असलेल्या सुनवणीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
Follow us
| Updated on: Nov 09, 2021 | 8:36 AM

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेतील मोहिते-पाटील गटाच्या 6 सदस्यांना अपात्र करण्यासाठी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुरु असलेल्या सुनवणीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ‘न्यायशास्त्रात विशेष प्रावीण्य’ मिळवलेल्या व्यक्तीकडून न्यायदान व्हावे, अशी मागणी मोहिते- पाटील गटाच्या जिल्हा परिषद सदस्यांनी उच्च न्यायालयात केली होती. याच सुनावणीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. दिवाळीच्या सुट्टीत पाडव्याच्या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. जे. काथावाला व न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांनी सुनावणी घेतली.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी मोहिते पाटील गटाच्या शितल देवी मोहिते-पाटील ,स्वरूपा राणी मोहिते पाटील, अरुण तोडकर ,गणेश पाटील, मंगल वाघमोडे, यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्यापुढे हे प्रकरण सुनावणीस आल्यानंतर उच्च न्यायालयात अपील करण्यात आलं. अपील फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती.

राष्ट्रवादीची मागणी काय?

2017 च्या निवडणुकीत माळशिरस तालुक्यातील मोहिते-पाटील गटाचे सहा सदस्य राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले आहेत. मात्र जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत बंडखोरी केल्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव झाला होता. बंडखोरी केलेल्या सदस्यांना पक्षांतरबंदी कायदा अंतर्गत अपात्र ठरवून सदस्यत्व रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी केली होती.

सर्वोच्च न्यायालयाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे चेंडू

तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे यावर सुनावणी सुरु होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या सुनावणीच्या विरोधात उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात मोहिते पाटील गटाच्या सहा सदस्यांनी दाद मागितली होती. मात्र मोहिते पाटील गटाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळत जिल्हाधिकारी यावर सुनावणी ठेवून निर्णय घेतील, असा आदेश दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत प्रशासनाकडे पोहोचली असून आता जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयावर त्या सहा सदस्यांचे भवितव्य अवलंबून आहे.

कोणाकोणावर कारवाईची टांगती तलवार?

माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्य स्वरुपाराणी मोहिते-पाटील, शितलादेवी मोहिते-पाटील, अरुण तोडकर, मंगल वाघमोडे, सुनंदा फुले, गणेश पाटील या सदस्यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी विरोधात बंडखोरी केली होती. त्यामुळे मोहिते पाटील गटाच्या या सहा जिल्हा परिषद सदस्यांना अपात्र करण्याची मागणी राष्ट्रवादी पक्षाकडून करण्यात आली होती.

नेमकं प्रकरण काय आहे?

माळशिरस तालुक्यातील मोहिते-पाटील गटाच्या सहा सदस्यांना अपात्र करावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे गटनेते बळीराम साठे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. याप्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्याकडे सुनावणी सुरु असताना हा विषय उच्च न्यायालयात गेला होता.

सहा सदस्यांना त्यावेळीही तात्पुरता दिलासा मिळाला होता, तरी उच्च न्यायालयाने हा विषय पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवला. माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्य स्वरुपाराणी मोहिते-पाटील, शितला देवी मोहिते-पाटील, अरुण तोडकर, मंगल वाघमोडे, सुनंदा फुले आणि गणेश पाटील या सदस्यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीविरोधात बंडखोरी केली होती.

काँग्रेस आणि शिवसेनेचे सदस्य फोडून भाजप आणि मोहिते पाटील गटाने थेट आपला अध्यक्ष जिल्हा परिषदेवर बसवला होता. मोहिते पाटील गटाचे अनिरुद्ध कांबळे अध्यक्षपदी विराजमान झाले, तर औताडे गटाचे दिलीप चव्हाण उपाध्यक्ष झाले.

बंडखोर सदस्यांना अपात्र करण्याची मागणी राष्ट्रवादी पक्षाकडून करण्यात आली होती. त्यामुळे या सदस्यांच्या संदर्भातली सुनावणी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात झाली. जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच सदस्यांना तात्पुरता दिलासा मिळाला.

(Maharashtra Solapur Zilha Parishad Postpones Of Hearing Zp Member Of Mohite patil)

हे ही वाचा :

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले, ‘ठाकरेंचं सरकार उखडून फेका’, राऊत म्हणतात, ‘दुसऱ्यांना उखडता-उखडता…’

VIDEO: भास्कर जाधवांकडून पंतप्रधान मोदींची मिमिक्री, म्हणाले…

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.