अतिवृष्टीमुळे नांदेडमध्ये मोठं नुकसान, तातडीने पंचनामे करा, आमदार जवळगावकर वडेट्टीवर-अशोक चव्हाणांच्या भेटीला

| Updated on: Jul 24, 2021 | 10:18 AM

नांदेड जिल्ह्यातील हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झालंय. शेतकऱ्यांचे झालेल्या या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी आमदार जवळगावकर यांनी केलीय.

अतिवृष्टीमुळे नांदेडमध्ये मोठं नुकसान, तातडीने पंचनामे करा, आमदार जवळगावकर वडेट्टीवर-अशोक चव्हाणांच्या भेटीला
नांदेडमधल्या शेतकऱ्यांचं पावसाने मोठं नुकसान झालंय. आमदार जवळगावकर यांनी मंत्री अशोक चव्हाण आणि वडेट्टीवार यांची भेट घेतली.
Follow us on

नांदेड : जिल्ह्यातील हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झालंय. शेतकऱ्यांचे झालेल्या या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी हदगांवचे आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांनी केलीय. आमदार पाटील यांनी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह पालकमंत्र्याची भेट घेऊन ही मागणी केलीय.

ओढे नदी नाल्याचं पाणी शेतात शिरलं, शेकडो हेक्टर क्षेत्रावरची पिके पाण्याखाली

नांदेडसह शेजारच्या हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालीय. त्यामुळे कयाधु आणि पैनगंगा नदी दुथडी भरून वाहिल्या. नद्या ओवरफलो झाल्याने पाण्याचा फुगवटा तयार झाला, त्यातून अनेक ओढ्या नाल्याचे पाणी शेतात शिरलंय. त्यामुळे हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातील शेकडो हेक्टर क्षेत्रावरची पिके अद्यापही पाण्याखाली आहेत. सातत्याने चार दिवस सूर्यदर्शन नसल्याने आणि पाणी साचून राहिल्याने सोयाबीन, कापूस, तूर, उडीद आणि मुंगाचे पिके पिवळी पडली आहेत.

शेतकऱ्यांची व्यथा आमदार जवळगांवकरांनी सरकार दरबारी मांडली

शेतकऱ्यांच्या झालेल्या या नुकसानीची माहिती आमदार जवळगांवकर यांनी सरकारच्या दरबारी मांडलीय. जवळगांवकर यांनी तातडीने मुंबई गाठत मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांना आमदारांनी निवेदन देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केलीय.

अतिवृष्टीमुळे नांदेडमध्ये मोठं नुकसान

दरम्यान, अतिवृष्टीमुळे हदगावसह हिमायतनगर तालुक्यातील अनेक रस्ते वाहून गेले आहेत. जागोजागी रस्ते खचून गेल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय. त्याच बरोबर अनेक पुलाचे देखील नुकसान झालेय. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत असल्याचे आमदारांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. रस्त्याच्या या दुरुस्तीकडे शासनाने लक्ष द्यावे अशी मागणी देखील त्यांनी केलीय.

(Mla madhavrao javalgaokar meet ashok chavan vijay wadettiwar over nanded heavy rain farmer big loss)

हे ही वाचा :

कोव्हिड काळात नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षकाचा अभिनव उपक्रम; पंतप्रधान कार्यालयाकडून दखल, मोदी संवाद साधणार