मेहुण्यापेक्षा दाजी वरचढ; बाजार समितीच्या निवडणुकीत खासदाराने आमदाराला दाखवले आस्मान

नांदेड जिल्ह्यात कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत चांगलीच चुरस बघायला मिळाली. विशेष म्हणजे या निवडणुकीत खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि आमदार श्यामसुंदर शिंदे या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती.

मेहुण्यापेक्षा दाजी वरचढ; बाजार समितीच्या निवडणुकीत खासदाराने आमदाराला दाखवले आस्मान
Follow us
| Updated on: Sep 04, 2023 | 8:41 PM

नांदेड | 4 सप्टेंबर 2023 : नांदेड जिल्ह्यातील लोहा-कंधार या विधानसभा मतदारसंघात खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा अद्यापही वरचष्मा असल्याचे उघड झालंय. कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत खासदार चिखलीकर गटाने 18 पैकी 10 जागांवर विजय मिळवलाय. विशेष म्हणजे चिखलीकर यांचे मोठे मेहुणे असलेल्या आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी 18 पैकी 7 जागा जिंकत मतदारसंघावर काहीशी पकड असल्याचे सिद्ध केलंय. तर बीआरए ला एका जागेवर यश मिळालंय.

मात्र नांदेड लोकसभेचे प्रतिनिधित्व करणारे खासदार चिखलीकर यांच्या नांदेड लोकसभा मतदारसंघात कंधार तालुका येत नाही, त्यामुळे खासदार चिखलीकर यांच्या गटाचे बहुमताचे यश उजळून निघालंय. कंधार विधानसभा मतदारसंघात चिखलीकर यांची ताकत शाबूत असल्याचे या निमित्ताने उघड झालं आहे. त्यामुळे आगामी काळात कंधार विधानसभा मतदारसंघात आगामी काळात दाजी-मेहुण्यांतील संघर्ष आणखीन तीव्र होणार आहे. त्यामुळे “मन्याड खोऱ्याचे ” राजकारण चांगलंच तापणार आहे.

दाजी-मेहुण्यातील नेमका वाद काय?

खासदार प्रताप पाटील यांच्या जेष्ठ भगिनी ह्या आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या पत्नी आहेत. आमदार होण्यापूर्वी श्यामसुंदर शिंदे हे सनदी अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. गत विधानसभा निवडणुकीच्या वेळी श्यामसुंदर शिंदे यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी कंधारमधून प्रताप पाटील यांचे पुत्र प्रवीण हे देखील इच्छुक होते. मात्र बहिणीच्या हट्टापुढे खासदार प्रताप पाटील यांनी शरणागती पत्करली आणि मेहुण्याच्या निवडणुकीचा प्रचार केला. या निवडणुकीत श्यामसुंदर शिंदे दणदणीत मताने विजयी देखील झाले.

नात्यात नेमका दुरावा आला कसा?

गत विधानसभा निवडणुकीच्या वेळी एकदा श्यामसुंदर शिंदे यांना विधानसभा आणि पुढच्या वेळी प्रवीण पाटील यांना संधी देण्यात येईल, असे माळाकोळी इथल्या मंदिरात सर्वांच्या साक्षीने ठरवण्यात आले होते. इतकंच काय तर मी आमदार म्हणून निवडून आलो तरी कारभारी म्हणून प्रवीण पाटील हा माझा भाचा राहील, असा शब्द श्यामसुंदर शिंदे यांनी त्यावेळी दिला होता. पण निवडणूक निकाल येताच शिंदे यांना त्यांच्या शब्दाचा विसर पडला.

त्यानंतर दोन्ही कुटुंबातील काही आर्थिक व्यवहारात कटुता आली आणि दाजी-मेहुणे असलेले शिंदे-चिखलीकर वेगळे झाले. आता दोन्ही कुटुंबात विस्तव आडवा जात नाही, इतकी कटुता निर्माण झालीय. त्यामुळेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निम्मित्ताने दोघांनी एकमेकांच्या विरोधात जोरदार ताकत लावली होती. विशेष म्हणजे चिखलीकर गटाकडून या निवडणुकीची सर्व धुरा प्रवीण पाटील यांनी खांद्यावर घेतली होती.

दोघांच्या भांडणात तिसऱ्याला लाभाची प्रतीक्षा

कंधार विधानसभा मतदारसंघात चिखलीकर आणि शिंदे गटातील वितुष्ट सर्वश्रूत झालंय. त्यामुळे या दोघांच्या भांडणात आपला लाभ करून घेण्यासाठी माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून बीआरएस पक्षात उडी घेतलीय. धोंडगे यांनी काही दिवसांपूर्वी मोठे शक्ती प्रदर्शन करत विधानसभा निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत.

धोंडगे यांना हैद्राबादवरून होणाऱ्या रसदीच्या पुरवठ्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांची जुळवाजुळव सुरू केलीय. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष असलेल्या शिवा नरंगले हे देखील निवडणूक मैदानात असतील. तसेच काँग्रेस, शिवसेनेचे आव्हान इथून असणार आहेच. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत नांदेडमधला सर्वाधिक चर्चेत राहणारा मतदारसंघ म्हणून कंधार ओळखला जाणार आहे. त्यात चिखलीकर-शिंदे गटाचे काय भवितव्य असेल? याबाबत सर्वांना उत्सुकता आहे.

धनंजय मुंडे यांचं सुरेश धस अन् मनोज जरांगे पाटलांना खुलं आव्हान
धनंजय मुंडे यांचं सुरेश धस अन् मनोज जरांगे पाटलांना खुलं आव्हान.
पालकमंत्रीपदावरून शिवसेना नाराज? एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावी?
पालकमंत्रीपदावरून शिवसेना नाराज? एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावी?.
G-Pay नं पेमेंट अन् सुगावा, मध्यरात्री सैफच्या आरोपीला ठोकल्या बेड्या
G-Pay नं पेमेंट अन् सुगावा, मध्यरात्री सैफच्या आरोपीला ठोकल्या बेड्या.
पहाटेचा शपथविधी एक षडयंत्र, धनंजय मुंडे यांचा नेमका कोणाकडे इशारा?
पहाटेचा शपथविधी एक षडयंत्र, धनंजय मुंडे यांचा नेमका कोणाकडे इशारा?.
प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव, आगीत 100 हून तंबू जळून खाक
प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव, आगीत 100 हून तंबू जळून खाक.
'मीच दादांना पालकमंत्रीपद घेण्याची विनंती केली, कारण..' - धनंजयय मुंडे
'मीच दादांना पालकमंत्रीपद घेण्याची विनंती केली, कारण..' - धनंजयय मुंडे.
'मी दादांना सांगितलं होतं की..',पहाटेच्या शपथविधीवरून मुंडेंचं वक्तव्य
'मी दादांना सांगितलं होतं की..',पहाटेच्या शपथविधीवरून मुंडेंचं वक्तव्य.
धनंजय मुंडेंना सरपंच हत्या प्रकरण भोवलं? बीड पालकमंत्रीपदाचा पत्ता कट
धनंजय मुंडेंना सरपंच हत्या प्रकरण भोवलं? बीड पालकमंत्रीपदाचा पत्ता कट.
'हीच आमची इच्छा होती..', बीडच्या पालकमंत्रीपदावर काय म्हणाले सुरेश धस?
'हीच आमची इच्छा होती..', बीडच्या पालकमंत्रीपदावर काय म्हणाले सुरेश धस?.
सैफच्या हल्लेखोराला बेड्या; बघा आरोपीच्या अटकेचा थरार, कसा घेतला शोध?
सैफच्या हल्लेखोराला बेड्या; बघा आरोपीच्या अटकेचा थरार, कसा घेतला शोध?.