नाव न सांगण्याच्या अटीवर मुंबईतल्या सर्वसामान्य व्यक्तीकडून पांडुरंगाचरणी 1 कोटी रुपयांचं दान

पांडुरंगाच्या दान पेटीत मुंबईतील एका सामान्य कुटुंबातील भाविकाने नाव न सांगण्याच्या अटीवर तब्बल एक कोटी रुपयांचे दान मंदिर समितीला दिले आहे.

नाव न सांगण्याच्या अटीवर मुंबईतल्या सर्वसामान्य व्यक्तीकडून पांडुरंगाचरणी 1 कोटी रुपयांचं दान
कोरोना संसर्गामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर बंद आहे.

पंढरपूर : पंढरीचा पांडुरंग हा गरीबांचा बालाजी म्हणून ओळखला जातो. अनेक भाविक दर्शनासाठी शेकडो मैल पायी येतात आणि सावळ्या विठुरायाच्या चरणी लीन होतात. याच विठुरायाच्या दान पेटीत मुंबईतील एका सामान्य कुटुंबातील भाविकाने नाव न सांगण्याच्या अटीवर तब्बल एक कोटी रुपयांचे दान मंदिर समितीला दिले आहे. (Mumbai person Donate 1 Crore To Pandharpur Temple On condition of anonymity)

मंदिर समितीच्या इतिहासामध्ये प्रथमच एका भाविकाकडून एक कोटीचं दान

मुंबईमधल्या एका कुठल्याशा भागात राहणाऱ्या एका सर्व सामान्य विठ्ठल भक्ताने ही देणगी दिली आहे. मंदिर समितीच्या इतिहासामध्ये प्रथमच एका भाविकाकडून एक कोटीचं दान मिळाले आहे.

मंदिर अनेक महिन्यांपासून बंद, देणग्यांमध्ये घट, कोटीच्या देणगीने मंदिर समितीला मोठा आधार

कोरोना काळामध्ये विठ्ठल मंदिर मागील अनेक महिन्यांपासून बंद आहे. परिणामी मंदिराला येणाऱ्या देणग्यांमध्ये मोठी घट झाली आहे. अशातच एका भाविकाने एक कोटीची देणगी दिल्याने मंदिर समितीला मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.

इन्शुरन्स कंपनीकडून पैसे मिळाले, पांडुरंगाचरणी अर्पण केले!

मुंबईतील विठ्ठल भक्ताचे अलीकडेच कोरोनामुळे निधन झाले. त्यानंतर या भाविकाला एका इन्शुरन्स कंपनीकडून काही पैसे मिळाले ते आलेले सर्व पैसे या भक्ताच्या कुटुंबीयांनी चेकच्या स्वरुपात विठ्ठलाच्या दान पेटीत अर्पण केले. इतकी मोठी रक्कम दान देऊन ही या भाविकाने आपले नाव मात्र गुप्त ठेवण्याची विनंती मंदिर समितीला केली आहे.

हे ही वाचा :

Video : चिमुकल्याला वाचवताना साक्षीनं पाय गमावला; महाराजांच्या पोशाखात अमोल कोल्हेंचा साक्षीला त्रिवार मुजरा

MHADA Lottery 2021 Update: म्हाडा यंदा 9 हजार घरांची लॉटरी काढणार, सामान्यांचं स्वप्न सत्यात उतरणार

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI