Sahastrakund Waterfall | नयनरम्य दृष्य… सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित, धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी!

| Updated on: Jun 27, 2022 | 9:20 AM

पर्यटकांच्या सोयीसाठी इथल्या प्रशासनाने आता चांगल्याच सोयी केल्या आहेत. या धबधब्याचे नयनरम्य दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी उंच मनोरे तयार करण्यात आलेत. या मनोऱ्यावर जाऊन निवांतपणे धबधबा पाहता येतोय, त्यातून पर्यटक आता मोठ्या प्रमाणात फोटोग्राफी करताना दिसतायत. त्यासोबतच इथे जेवणाची उत्तम सोय देणाऱ्या हॉटेल पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत.

Sahastrakund Waterfall | नयनरम्य दृष्य... सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित, धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी!
Image Credit source: tv9
Follow us on

नांदेड : नांदेडमध्ये (Nanded) इस्लापुर जवळचा सहस्त्रकुंड इथला पैनगंगा नदीवरचा धबधबा आज प्रवाहित झालायं. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे हा धबधबा आज पुन्हा खळाळून वाहतोय. दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात वाहणारा सहस्त्रकुंड (Sahastrakund) धबधबा प्रवाहित होण्यास यंदा जून महिन्याचा शेवटचा आठवडा उजाडलाय. या धबधब्यामुळे आता पर्यटकांची पावले सहस्त्रकुंडकडे वळणार आहेत. मराठवाडा आणि विदर्भाचे विभाजन करणारी नदी म्हणून पैनगंगा नदीची ओळख आहे. या नदीवर नांदेडच्या किनवट तालुक्यातील इस्लापुरगावा जवळच्या सहस्त्रकुंड इथे नैसर्गिकरित्या पैनगंगा नदीवर धबधबा आहे. हा धबधबा दरवर्षी पावसाळ्यात पर्यटकांचे (Tourists) आकर्षणाचे केंद्र बनते. यंदा पावसाला थोडा उशीर झाल्याने हा धबधबा आता प्रवाहित झालाय.

नयनरम्य दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी उंच मनोरे

पर्यटकांच्या सोयीसाठी इथल्या प्रशासनाने आता चांगल्याच सोयी केल्या आहेत. या धबधब्याचे नयनरम्य दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी उंच मनोरे तयार करण्यात आलेत. या मनोऱ्यावर जाऊन निवांतपणे धबधबा पाहता येतोय, त्यातून पर्यटक आता मोठ्या प्रमाणात फोटोग्राफी करताना दिसतायत. त्यासोबतच इथे जेवणाची उत्तम सोय देणाऱ्या हॉटेल पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. आजूबाजूला असलेली वनसंपदा देखील पर्यटकांना अनुभवता येतेय.

हे सुद्धा वाचा

सहस्त्रकुंड इथे आकर्षक असा एक बगीचा

सहस्त्रकुंड धबधबा परिसरात जवळपास 10 एकर वन विभागाच्या जमिनीवर गेल्या काही वर्षापासून अतिक्रमण झालेले होते. नुकतेच प्रशासनाने मोठा फौजफाटा वापरत हे अतिक्रमण हटवलय, त्यामुळे आता इथे आकर्षक असे वृक्षारोपण करण्यास वनविभाग पुढाकार घेतोय. त्याचबरोबर वनविभागाने सहस्त्रकुंड इथे आकर्षक असा एक बगीचा तयार केलाय, रोपवाटिकेच्या माध्यमातून लागवड केलेली नर्सरी देखील पर्यटकांना पाहता येणार आहे. नांदेडहून जवळपास दीडशे किलोमीटर असलेल्या सहस्त्रकुंडला रेल्वे आणि रस्ते मार्गाने जाता येते. जवळचे रेल्वे स्टेशन इस्लापुर आहे.

सहस्त्रकुंडला कसे जावे ?

रस्त्याने कसे जावे- नांदेड- भोकर- हिमायतनगर – इस्लापुर हुन सहस्त्रकुंडला जाता येऊ शकते. विदर्भातील पर्यटकांना उमरखेड हुन ढाणकी बिटरगाव मार्गे सहस्त्रकुंड पाहता येऊ शकते. मात्र धबधब्याच्या तिकडच्या बाजूकडून धबधबा जवळून पाहता येत नाही. त्यामुळे इस्लापुर मार्गे सहस्त्रकुंड हे एक दिवसाच पावसाळी पर्यटन हौशी मंडळींसाठी पैसेवसूल ठरेल. आता धबधबा वाहून लागल्याने पर्यटकांची मोठी गर्दी बघायला मिळते. धबधब्यामुळे थंड वारे देखील मोठ्या प्रमाणात वाहते.